इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, याला कारण म्हणजे शेअर बाजारांमध्ये चढउतार होत असला तरी काही पेनी स्टॉक मध्ये ग्राहकांना चांगला फायदा होतो, असे दिसून आले आहे. मल्टीबॅगर पेनी स्टॉक लिस्टमधील अशा पाच पेनी स्टॉक्सबद्दल आपण माहिती आहोत. केवळ पाच महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. Ace Equity च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत सुमारे 30 पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. यापैकी अर्धा डझन स्टॉक असे आहेत की, त्यांनी गेल्या पाच महिन्यांत 600 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. पेनी शेअर्सच्या श्रेणीमध्ये ते शेअर्स येतात ज्यात शेअर्सची किंमत सिंगल डिजिट किंवा 10 रूपयांपेक्षा कमी आहे.
कैसर कॉर्पोरेशन:
प्रिंटिंग सोल्यूशन्स कंपनी कैसर कॉर्पोरेशनच्या स्टॉकने 2022 मध्ये या वर्षी आतापर्यंत 2,756.16 टक्के परतावा दिला आहे. दि. 3 जानेवारी रोजी म्हणजे या वर्षाच्या आर्थिक पहिल्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर 2.92 रुपयांवर होता, जो आता वाढून 83.40 रुपये झाला आहे. म्हणजेच या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला 28.56 लाख रुपयांचा नफा झाला असेल.
हेमांग रिसोर्सेस:
मेटल मर्चंट फर्म हेमांग रिसोर्सेसचे शेअर्स YTD मध्ये 3.12 रुपयांवरून 47.30 रुपयांपर्यंत वाढले. या कालावधीत समभागाने 1,416.03 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच, गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 3.12 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 15.16 लाख रुपये झाली असती.
Gallops Enterprise:
यांच्या शेअर्सनी या वर्षी 3 जानेवारीपासून 1,094.56 टक्के परतावा दिला आहे. या काळात हे शेअर्स 4.78 रुपयांवरून 57.10 रुपयांपर्यंत वाढले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 4.78 रुपये दराने 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 11.94 लाख रुपये झाली असती.
Alliance Integrated Metaliks Ltd:
या कंपनीचे शेअर्स या वर्षी रु. 2.84 वरून 29.30 पर्यंत वाढले आहेत. या कालावधीत या समभागाने ९३१.६९% परतावा दिला आहे. म्हणजेच या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला 10.31 लाख रुपयांचा नफा झाला असेल.
BLS Infotech Ltd:
कंपनीचे शेअर YTD मध्ये 66 पैशांनी वाढून 5.11 रुपये झाले. या दरम्यान त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 674.24 टक्के परतावा दिला आहे. म्हणजेच या वर्षी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या कोणत्याही गुंतवणूकदाराला 7.74 लाख रुपयांचा नफा झाला असेल.
(महत्त्वाची सूचनाः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे अतिशय जोखमीचे असते. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा)