मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात गुंतवणूक करणे अतिशय जोखमीचे असते. मात्र, असे काही शेअर असतात ज्यामुळे शेअरधारकांची लॉटरी लागते. राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. च्या मल्टीबॅगर पेनी स्टॉक हा त्यापैकीच एक आहे. या समभागाने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 5,290 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बीएसईवर हा शेअर सध्या 11.86 रुपयांच्या आसपास आहे.
राज रायन इंडस्ट्रीजचे शेअर्स एका वर्षापूर्वी 24 मे 2021 रोजी BSE वर 22 पैसे प्रति शेअर या पातळीवर होते, जे आता एका वर्षात 11.64 रुपयांनी वाढून 11.86 रुपये झाले आहेत. या कालावधीत त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 5,290.91 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, या शेअरने यावर्षी YTD मध्ये 778.52 टक्के परतावा दिला आहे. या दरम्यान तो 1.35 रुपयांवरून 11.86 रुपयांपर्यंत वाढला. गेल्या एका महिन्यात राज रेयॉन इंडस्ट्रीजचा शेअर 4.77 रुपयांवरून 11.86 रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात 149.16% परतावा दिला आहे. मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये या समभागाने 21.27 टक्के परतावा दिला आहे.
राज रायन इंडस्ट्रीजच्या शेअर किंमत चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 53.90 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी 2022 मध्ये या काउंटरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याला 8.78 लाख रुपये मिळाले असते. तसेच महिनाभरापूर्वी एक लाखाची गुंतवणूक केल्यास 2.48 लाख रुपयांचा फायदा झाला असता.
(महत्त्वाची सूचना- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे अतिशय जोखमीचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्यावा)