इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारामध्ये चढउतार सुरूच असतात. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याचे असते. मात्र, असे काही शेअर आहेत जे गुंतवणूकदारांना छप्पर फाडके परतावा देतात. असाच एक शेअर आहे विनती ऑरगॅनिक्स केमिकल कंपनीचा. या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 2 लाख टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
विशेष म्हणजे या कंपनीचे शेअर्स 75 पैशांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1 लाख रुपये ठेवणारे ग्राहक करोडपती झाले आहेत. विनती ऑरगॅनिक्स शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,289.55 रुपयांचा आहे. दि. 7 नोव्हेंबर 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स 75 पैशांच्या पातळीवर होते. तसेच कंपनीचे शेअर्स 19 मे 2022 रोजी BSE वर 2046.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी 200,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
एखाद्या व्यक्तीने 7 नोव्हेंबर 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 27.28 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअर्सने 50 ते 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.
विनती ऑरगॅनिक्सच्या समभागांनी गेल्या 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स 50 ते 2,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 6 सप्टेंबर 2013 रोजी कंपनीचे शेअर्स 44.58 रुपयांच्या पातळीवर होते.
दि. 19 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,046.10 रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 6 सप्टेंबर 2013 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 45.89 लाख रुपये झाले असते.
(महत्त्वाची सूचना- शेअर बाजारात गुंतवणूक करणे अतिशय धोक्याचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्यावा)