मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जवळपास १५ वर्षांपूर्वी इनरविअर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा भाव ३०० रुपयांच्या स्तरावर होता. आता तो ४१ हजार रुपये झाला आहे. यादरम्यान गुंतवणूकदारांना १५ हजार टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. ज्या कंपनीने ही कामगिरी केली आहे तिचे नाव आहे, पेज इंडस्ट्रीज लिमिटेड. आता कंपनीच्या तिमाहीचे निष्कर्ष डिसेंबरमध्ये जारी करण्यात आले आहेत. तसेच कंपनीने गुंतवणूकदारांना अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
डिसेंबरच्या तिमाहीमध्ये पेज इंडस्ट्रीज लिमिटेडला झालेला लाभ १३.५८ टक्क्यांनी वाढ झाली असून, तो १७४.५७ कोटी रुपये झाला आहे. पेज इंडस्ट्रीजने बीएसई फायलिंगमध्ये सांगितले की, कंपनीने एका वर्षापूर्वी ऑक्टोबर-डिसेंबर या काळादरम्यान १५३.७० कोटी रुपयांचा शुद्ध लाभ झाला होता. तिमाहीदरम्यान कंपनीच्या महसुलात २८.३४ टक्के वाढून तो १,१८९.८० कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात तो ९२७.०६ कोटी रुपये होता. त्याशिवाय कंपनीकडून १०० रुपये प्रति इक्विटी शेअर लाभांश देणार आहे. पेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअरचे भाव १५ वर्षांपासून वाढत आहेत. त्यामुळेच कंपनीचा स्टॉक भाव ४५, १६२ रुपयांच्या उच्च स्तरावर पोहोचला होता. सध्या कंपनीच्या शेअरचा भाव ३.४१ टक्क्यांनी घटून ४०९४६.५५ रुपयांच्या स्तरावर आला आहे. पेज इंडस्ट्रीज भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, ओमान, कतार, मालदीव, भूटान आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये बांधकाम, वितरण आणि विपणनसाठी जॉकी इंटरनॅशनल इंकचा सहकारी आहे. भारतीय बाजारात ही कंपनी स्पि़डो इंटरनॅशनलसोबत काम करत आहे.