इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजार हा एक जुगार म्हटला जातो, परंतु त्यामध्ये गुंतवणूकदारांचा कधी कधी खूपच फायदा होतो, त्यातच सध्या बिग बुल ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती महिन्याभरात तब्बल 832 कोटी रुपयांनी वाढली आहे. झुनझुनवाला यांची संपत्ती वाढण्याचे कारण म्हणजे त्याच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट केलेले दोन स्टॉक. हे दोन स्टॉक स्टार हेल्थ आणि मेट्रो ब्रँड्स आहेत, गेल्या काही दिवसांपासून ते सतत तेजीत होते. गेल्या एका महिन्यात स्टार हेल्थच्या शेअरची किंमत 686.60 रुपयांवरून 741.10 रुपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत प्रति शेअर 54.50 रुपयांची वाढ झाली. त्याचप्रमाणे, मेट्रो ब्रँडचा शेअर गेल्या एका महिन्यात 531.95 रुपयांवरून 604 रुपये प्रति शेअर झाला आहे. यावेळी ते सुमारे 72.05 रुपये प्रति शेअर वर गेले.
बिग बुल राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांची स्टार हेल्थ कंपनीत हिस्सेदारी आहे. राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 10,07,53,935 शेअर्स आहेत, जे कंपनीच्या एकूण जारी केलेल्या पेड-अप भांडवलाच्या सुमारे 17.50 टक्के आहे.
ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीसाठी मेट्रो ब्रँड्सच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांनी त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्यामार्फत या कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी निष्ठा झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट, आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट आणि आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रेशनरी ट्रस्ट या तीन ट्रस्टच्या माध्यमातून या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.
निष्ठा झुनझुनवाला डिस्क्शनरी ट्रस्टच्या विश्वस्त म्हणून रेखा झुनझुनवाला 1,30,51,188 मेट्रो ब्रँडचे शेअर्स किंवा 4.81 टक्के स्टेक आहेत. आर्यवीर झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्ट आणि आर्यमन झुनझुनवाला डिस्क्रिशनरी ट्रस्टचे विश्वस्त म्हणून, त्यांच्याकडे दोन्ही ट्रस्टमध्ये अनुक्रमे 1,30,51,206 शेअर्स किंवा 4.81 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँड्समध्ये 3,91,53,600 शेअर्स आहेत, जे फुटवेअर कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 14.43 टक्के आहे.
स्टार हेल्थच्या शेअर्सची किंमत ₹54.50 ने वाढल्याने आणि राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 10,07,53,935 स्टार हेल्थ शेअर्स आहेत, गेल्या एका महिन्यात राकेश झुनझुनवालाच्या पोर्टफोलिओ स्टॉकमध्ये वाढ झाल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांच्या नेट वर्थमध्ये वाढ झाली. नफा सुमारे ₹50 कोटी आहे.
त्याचप्रमाणे रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मेट्रो ब्रँडचे 3,91,53,600 शेअर्स आहेत आणि राकेश झुनझुनवाला यांचा हा स्टॉक गेल्या एका महिन्यात ₹72.05 प्रति शेअरने वाढला आहे, राकेश झुनझुनवाला यांच्या मालमत्तेत गेल्या एका महिन्यात या दोन नव्याने सूचीबद्ध केलेल्या पोर्टफोलिओ समभागातील तेजीनंतर एकूण ₹832 कोटी वाढ झालेली आहे.