मुंबई – शेअर बाजार हा एक प्रकारे जुगार असून परंतु योग्य प्रकारे व्यवहार केल्यास त्यामध्ये फायदा देखील होऊ शकतो, असा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास एखाद्याचे नशीब बदलून जाईल हे सांगता येत नाही. परंतु त्यासाठी त्या विषयाची योग्य माहिती असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. शेअर मार्केट मुळे नशीब पालटू शकते. कसे काय जाणून घेऊ..
अपेक्षेपेक्षा जास्त परतावा
शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या असून त्यांच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. यापैकी काहींमध्ये पेनी स्टॉकचाही समावेश आहे. सन 2021 हे वर्ष शेअर बाजारासाठी खूप खास आहे. या वर्षी अनेक कंपन्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आणि त्यामुळे गुंतवणूकदारही श्रीमंत झाले. विशेषतः पेनी स्टॉकच्या कामगिरीने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले. असाच एक पेनी स्टॉक म्हणजे 3i इन्फोटेक होय. गेल्या 3 महिन्यांत 1200 टक्के परतावा दिला आहे.
काय आहे शेअरची स्थिती
गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 35.85 रुपयांवरून 108.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 200 टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 3 महिन्यांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 8.45 रुपये प्रति शेअरवरून 108.50 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत सुमारे 1200 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट सुरू आहे.
गुंतवणुकीचा चांगला परिणाम
एखाद्या गुंतवणूकदाराने आठवड्यापूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले असतील तर त्याची रक्कम 1.21 लाख रुपये झाली असेल. गुंतवणूकदाराने महिन्याभरापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले होते, त्यानंतर आज त्याची रक्कम 3 लाख रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 3 महिन्यांपूर्वी 8.45 रुपयांमध्ये 1 लाख गुंतवले असतील तर आज त्याची रक्कम 13 लाख रुपये झाली आहे.
(महत्त्वाची सूचना – ही माहिती देताना आमचा कुठलाही हेतू नाही. गुंतवणूक करताना खासकरुन शेअर खरेदी करताना विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. ते जोखमीचेही आहे.)