मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारामधील मोठे गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश असलेल्या रियल्टी लिमिटेडच्या शेअर्सनी मंगळवारी उसळी घेतली. गुंतवणूकदारांना मालामाल करणारा स्टॉक आजच्या व्यावसायिक सत्रात बीएसईवर ५ टक्क्यांच्या वृद्धीसह १११ रुपयांवर पोहोचला. मुंबई येथील रियल्टी कंपनीद्वारे प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांना वॉरंट जारी करून ५६३ कोटी रुपये उभारण्याच्या योजनेच्या घोषणेनंतर हा स्टॉक सलग वाढत आहे. गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) ने ४०० कोटी रुपये गुंतवणूक करून डीबी रियल्टीमध्ये जवळपास १० टक्के भागिदारी मिळवल्यानंतर आणि संयुक्त पुनर्विकास मंचाची स्थापना करण्याच्या प्रस्तावाची घोषणा केली. याच्या एका दिवसानंतर गोदरेजने सांगितले की, इक्विटी भांडवली गुंतवणूक करण्याच्या योजनेसह पुढे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मल्टिबॅगर स्टॉकची एका महिन्यात ७७ टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली आहे. गेल्या सहा महिन्यात तो ३६४ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये १८ रुपये प्रति शेअर स्तराहून अधिक व्यवसाय केल्यामुळे रियल्टी स्टॉक एका वर्षात ४८९ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत डीबी रियल्टीचे शेअर्स १२६ टक्क्यांहून अधिक आहे. चॉइस ब्रोकिंगच्या सुमीत बगडिया यांनी सल्ला दिला की, गुंतवणूकदारांनी सध्या स्टॉकवर नवी खरेदी करू नये. नुकत्याच झालेल्या सत्रात काउंटर सर्किट-टू- सर्किटमध्ये वाढ होत आहे. बीएसईच्या शेअरधारिता पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर २०२१ पर्यंत डीबी रियल्टीमध्ये २.०६ टक्के भागिदारी आहे.