मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रत्येक नागरिक आपल्या भविष्याची काळजी म्हणून पैशाची गुंतवणूक करत असतो. यात प्रामुख्याने बँक, टपाल खाते आणि शेअर बाजार यांचा समावेश आहे. शेअर बाजारामध्ये नागरिकांना मोठा फायदा होऊ शकतो. मात्र त्यात गुंतवणूक करताना जोखीम किंवा धोका देखील आहे. कारण यात काही वेळा फायदा होऊ शकतो, तसेच प्रचंड तोटा देखील सहन करावा लागतो.
सध्या शेअर बाजार सकारात्मक आणि चांगली परिस्थिती असली तरी काही कंपन्यांचे शेअर मात्र पडले आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजारात रिकव्हरी पाहायला मिळाली. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. त्याचबरोबर असे काही शेअर्स असेही आहेत. ज्यांमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा 5 स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत
रघुवीर सिंथेटिक्स लिमिटेड
वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे दि. 3 जानेवारी रोजी, शेअरची किंमत 718 रुपये होती. त्याच वेळी दि. 7 जानेवारी रोजी शेअरचा भाव 585.60 रुपयांपर्यंत घसरला. म्हणजे या कालावधीत स्टॉक 18.53 टक्क्यांनी घसरला आहे. गुंतवणुकदारांनी केवळ 5 दिवसात प्रति शेअर 133.20 रुपये गमावले आहेत. कंपनीचे बाजार भांडवल 2,269.20 रूपये कोटी आहे.
अर्णव फॅशन्स लिमिटेड
वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे दि. 3 जानेवारी रोजी, शेअरची किंमत 174 रूपयांवर होती. त्याच वेळी दि. 7 जानेवारी रोजी शेअरचा भाव 141.70 रुपयांपर्यंत घसरला. या कालावधीत शेअरच्या किमतीत 18.52 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. स्टॉक फक्त ट्रेडिंगच्या 5 दिवसात 32.20 रुपये कमी झाला आहे. आता कंपनीचे बाजार भांडवल 212.62 कोटी रुपये आहे.
सूरज इंडस्ट्रीज ऑर्डर
वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच दि. 3 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे 155 रुपये होती. तर दि. 7 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 126.30 रुपये होती. कंपनीच्या शेअरची किंमत 18.46 टक्क्यांनी घसरली. या कंपनीच्या शेअरची किंमत केवळ पाच दिवसांत 28.60 रुपयांनी कमी झाली आहे.
अभिनव लीजिंग अँड फायनान्स लिमिटेड
वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच दि. 3 जानेवारी रोजी शेअरची किंमत 4.22 रुपये होती. त्याच वेळी दि. 7 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 3.44 रुपये होती. या आठवड्यात 18.48 टक्के तोटा झाला आहे. तसेच या पेनी स्टॉकचे बाजार भांडवल 18 कोटी रुपये आहे.
सिम्लेक्स पेपर्स लिमिटेड
वर्ष 2022 च्या पहिल्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच 3 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 96.85 रुपये होती. त्याच वेळी, 7 जानेवारी रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 78.95 रुपये होती. या 5 ट्रेडिंग दिवसांमध्ये स्टॉक 18.48 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच आर्थिक बाबतीत यात 17.90 रुपयांची घट झाली आहे.