शुक्रवार, ऑगस्ट 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बजेटनंतर आपल्या पोर्टफोलिओत आवर्जून दाखल करावेत असे पाच स्टॉक्स

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 17, 2022 | 5:34 am
in इतर
0
share market1 scaled e1666592319475

 

बजेटनंतर आपल्या पोर्टफोलिओत आवर्जून दाखल करावेत असे पाच स्टॉक्स

अनेक दिवसांची प्रतीक्षा आणि उत्सुकतेनंतर अखेर येत्या आर्थिक वर्षासाठीचे केंद्रीय बजेट जाहीर झाले. बाजारपेठेच्या अपेक्षेनुसारच हे बजेट पुरोगामी होते पण लोकानुनय करणारे नव्हते. बजेटच्या घोषणेबद्दल बाजारपेठेची (निफ्टी) प्रतिक्रिया ही मोठ्या प्रमाणात सकारात्मक होती आणि ही गोष्ट बजेटच्या दिवशी व त्यानंतर बाजारपेठेत झालेल्या हालचालींतून दिसून आली. याशिवाय निफ्टीचे विभागवार सूचकांक सकारात्मक दिशेने जाताना दिसले, याला केवळ बजेटच्या दिवशी ऑटो विभागातील घडामोडींचा अपवाद होता. आता बजेटच्या घोषणेभोवतीची चर्चा हळूहळू विरू लागली आहे तेव्हा आता गुंतवणूकदारांनी या चर्चेतून बाहेर येत आपल्या पोर्टफोलिओत काही अत्यावश्यक बदल करण्यासाठी पुढे येण्याची वेळ झाली आहे. यासाठी उचलायच्या पावलांपैकी एक पाऊल म्हणजे आपल्या गुंतवणूकीकडे दूरदर्शीपणे नजर टाकत काही महत्त्वाचे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करून घेणे. बजेटनंतर गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत कोणत्या पाच स्टॉक्सचा समावेश असावा याबद्दल सांगताहेत एंजेल वन लिमिटेडचे इक्विटी स्ट्रॅटजिस्ट श्री ज्योती रॉय.

अशोक लेलँड (NSE: ASHOKLEY):
अशोक लेलँड लि. (एएलएल) भारतीय सीव्ही उद्योगक्षेत्रातील काही अग्रगण्य कंपन्यांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष २१ मध्ये मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांच्या (एमएचसीव्ही) बाजारपेठेतील कंपनीचा वाटा ~२८ टक्के होता. चालू वर्षामध्ये अनेक आव्हाने येऊनही सीव्ही क्षेत्राने स्वत:ला ब-यापैकी सावरून धरले होते. आता बाजारपेठेतील वातावरणामध्ये सुधारणा होत आहे तसेच पायाभूत सोयीसुविधांवर केल्या गेलेल्या खर्चामुळे आणखी काही काळाने मागणी वधारण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्ष २१ मध्ये एमएचसीव्ही उद्योगक्षेत्रातील उत्पादनाचे प्रमाण हे गेल्या ~१२ वर्षातील सर्वात कमी होते आणि आम्हाला असे वाटते की, सीव्ही क्षेत्राच्या पुन्हा एकदा होत असलेल्या वाढीचे लाभ घेण्यासाठी ही कंपनी अगदी सुयोग्य जागी आहे. आमच्या मते, पायाभूत सोयीसुविधा आणि स्वेच्छा स्क्रॅपेज धोरणावर सरकारकडून होत असलेल्या खर्चाचा सर्वात मोठ लाभार्थी एएलएल हाच असणार आहे.

कल्पतरु पॉवर (NSE: KALPATPOWR):
ही कंपनी ऊर्जा, पायाभूत सुविधा तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये असेट क्रिएशनच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अलीकडच्या काळात कल्पतरुची स्वतंत्र कामगिरी काहीशी कमकुवत झाल्याचे दिसत होती. वस्तूमूल्यांमध्ये कच्चा मालाच्या किंमतीत मोठे चढउतार झाल्याने बोली लावण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीशी सावधगिरी बाळगली गेल्याने तसेच स्थानिक पारेषण आणि वितरण क्षेत्र (टीअॅण्डडी) एकूणच काहीसे कमकुवत झाल्याने ही स्थिती दिसून आली होती. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये मात्र कल्पतरूच्या सिव्हिल/इन्फ्रा ईपीसी कंपनी (जेएमसी) मध्ये मोठ्या प्रमाणात निधी येत असून त्यातून कंपनीच्या एकूण कामगिरी व महसुल निर्मितीस पाठबळ मिळू शकेल. इतकेच नव्हे तर स्थानिक रेल्वेचे भवितव्यही सुरक्षित दिसत आहे व कंपनीचा आंतरराष्ट्रीय टीअॅण्डडी (एलएमजी+फास्टटेल) कडूनही चांगली कामगिरी केली जात आहे. जागतिक बँकेच्या प्रकल्पांवरील निर्बंध काढून घेतल्यानेही कंपनीला पाठबळ मिळणार आहे.

जेके लक्ष्मी सिमेंट (NSE: JKLAKSHMI):
बजेटनंतर जिच्या स्टॉक्समधील गुंतवणुकीचा विचार करावा असे आणखी एक नाव आहे जेके लक्ष्मी सिमेंट. ही देशातील एक अग्रगण्य सिमेंट उत्पादक कंपनी आहे. उत्तर व पश्चिम भारताच्या प्रमुख बाजारपेठेत तिने आपले भक्कम स्थान तयार केले आहे व पूर्वेकडच्या बाजारपेठेतही तिच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे. जेके लक्ष्मी ही सर्वात कमी खर्चाची सिमेंट उत्पादक कंपनी असून नजिकच्या काळामध्ये, विशेषत: अलीकडच्या तिमाहीमध्ये मान्सून लांबल्याचा व छत्तीसगढ प्लान्टमधील ट्रान्सपोर्टर्सने बंद पुकारण्यासारख्या विशिष्ट घटनांचा प्रभाव जाणवल्यानंतर कंपनीने मागणीप्रती आपल्या दृष्टीकोनामध्ये बदल घडवून आणला. या सुधारणांचा फायदा या कंपनीला मिळू शकतो. स्थानिक प्रश्न आता मागे पडत चालला असताना आणि पायाभूत सुविधा/बांधकामाच्या आघाडीवर चांगल्या कामगिरीचे पाठबळ लाभल्याने मागणीच्या बाबतीत एकूणच परिस्थितीमध्य सुधारणा होत असताना कामगिरी आणि किंमती या दोन्ही बाबतीत गोष्टी कंपनीच्या दृष्टीने सकारात्मक ठरतील असे आम्हाला वाटते. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या समभागांतील गुंतवणूकीचा परतावा (आरओई) १८ टक्क्यांच्या आसपास राहील त्यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत राहील.

शोभा लिमिटेड (NSE: SOBHA):
येत्या एक-दोन वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या दृष्टीने जिच्याकडे लक्ष ठेवता येईल अशी कंपनी म्हणजे बेंगळुरू स्थित शोभा लिमिटेड. ही कंपनी एक भारतीय रिअल इस्टेट विकासक कंपनी आहे. ही कंपनी निवासी तसेच व्यावसायिक इमारतीच्या बांधकाम क्षेत्रात काम करते तसेच कंत्राटी व्यवसायही करते. शोभाच्या निवासी मालमत्तांच्या आगाऊ विक्रीपैकी ७० टक्के भाग हा बेंगळुरू बाजारपेठेतील आहे. भारतामधील आयटीक्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या या ठिकाणी आयटी कंपन्यांकडून अधिक लोकांना रोजगार दिला जाईल व त्यातून दक्षिण भारताच्या बाजारपेठेत राहत्या जागांची मागणी वाढेल असे आम्हाला वाटते. तयार घरांची सूची आणि बांधकामाधीन असलेल्या घरांची सूचीने गेल्या ७-८ वर्षांमध्ये निचांकी पातळी गाठली होती. आता मात्र शोभा डेव्हलपर्ससारख्या ब्रॅण्डेड कंपन्यांना ग्राहकांकडून प्राधान्य दिले जात आहे. कंपनीकडून विविध ठिकाणाच्या एकूण १२.५६ दशलक्ष चौरसफूट क्षेत्रावर पसरलेले १७ नवे प्रकल्प/फेझेस सुरू केले जाणे अपेक्षित आहे. यातील जास्तीत-जास्त प्रकल्प हे कंपनीकडे आधीपासूनच असलेल्या जवळपासच्या जमिनींवरच सुरू केले जातील. कंपनीकडे २०० दशलक्ष चौरसफूट विक्रीयोग्य क्षेत्र आहे.

ओबेरॉय रिअल्टी (NSE: OBEROIRLTY):
या आणखी एका रिअल इस्टेट कंपनीचे स्टॉक्स बाजारपेठेत जोरदार मुसंडी मारत आहेत. कंपनीचे बाजारपेठेतील स्थान आणि भांडवली स्थिती अत्यंत भक्कम आहे. ओबेरॉय रिअल्टी ही एमएमआर क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करणारी एक रिअल इस्टेट कंपनी आहे. कंपनीच्या व्यवसायामध्ये निवासी आणि व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. आर्थिक वर्ष २२ च्या तिस-या तिमाहीमध्ये कंपनीने काही चांगल्या आकडेवारीची नोंद केली. आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये ठाण्यात सुरू केलेल्या प्रकल्पासोबत आर्थिक वर्ष २२ च्या चौथ्या तिमाहीमध्ये गोरेगाव येथे एलिसियन टॉवर ‘बी’चे काम सुरू केले आहे, त्यामुळे येत्या एक-दोन तिमाहींमध्ये कंपनीच्या निवासी बांधकामांच्या क्षेत्रातील वाढीला वेग मिळत राहील अशी अपेक्षा आहे. वैविध्यपूर्ण महसूल स्त्रोत – कंपनीच्या महसुलाच्या स्त्रोतांमध्ये वैविध्य आहे. ओबेरॉय मॉल (०.५ एमएसएफ) व हॉटेल गटातील कॉमर्झ (१.१ एमएसएफ) आणि द वेस्ट (२६९ रूम कीज) कंपनीच्या मालकीचे आहेत. २०२२ मध्ये जागा भरल्या जाण्याचे प्रमाण वाढेल, अशी आमची अपेक्षा आहे. आगामी प्रकल्प – कंपनीचे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. बोरीवलीतील प्रकल्पाच्या सोबतीनेच कंपनीचा ठाण्यातील निवासी प्रकल्प आर्थिक वर्ष २३ मध्ये सुरू होईल, अशी कंपनीची अपेक्षा आहे. रिअल-इस्टेट क्षेत्रामध्ये एकसंधता – भारतभरातील टॉप-१० कंपन्यांमध्ये चांगली एकसंधता दिसून आली आहे. सर्वात आघाडीच्या या १० कंपन्यांकडे आता बाजारपेठेचा ११.२ टक्के हिस्सा आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण अवघे ५.४ टक्के इतके होते. या दहा कंपन्या भविष्यातही बाजारपेठेचा अधिकाधिक हिस्सा व्यापत राहतील, अशी आमची अपेक्षा आहे.

निष्कर्ष:
गेल्या एक-दोन वर्षांत या सर्व स्टॉक्सनी विविध शेअर बाजारांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहेच व या पाच कंपन्यांचा पाया व बाजारपेठेतील स्थानही भक्कम आहे. कंपन्यांचे एकूण गुडविल चांगले आहे व बाजारपेठेचा कल पाहता गुंतवणूकदारांना येत्या काही महिन्यांमध्ये या कंपन्यांकडून लक्षणीय, जोमदार कामगिरीची अपेक्षा ठेवता येईल. म्हणूनच आपल्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणू पाहणा-या आणि येत्या एक-दोन वर्षांमध्ये भरपूर परतावा देणा-या स्टॉक्सची त्यात भर टाकू पाहणा-या गुंतवणूकदारांसाठी हे पर्याय सर्वोत्तम आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नोकिया G21 लाँच! बॅटरी टिकेल तब्बल ३ दिवस; 50MP ट्रिपल कॅमेर्‍यासह ही आहेत वैशिष्ट्ये

Next Post

या क्रिकेटपटूंच्या पत्नींचा आहे खेळाशी संबंध; बघा, कोण कोण आहेत त्या…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

IMG 20250829 WA0359 1 scaled e1756465385113
स्थानिक बातम्या

अखेर अंबड एमआयडीसीत या संस्थेने रस्त्यावरील खड्डे बुजवले…वाहनधारकांना दिलासा

ऑगस्ट 29, 2025
kanda 11
इतर

भर सभेत अजित पवारांवर कांद्याची मार गरागर फिरवत फेकण्याचा प्रयत्न…दोन जण ताब्यात

ऑगस्ट 29, 2025
accident 11
क्राईम डायरी

दिंडोरीरोडवर भरधाव बुलेटने दिलेल्या धडकेत ४८ वर्षीय महिला ठार

ऑगस्ट 29, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत जरांगे पाटील आंदोलनाला बसताच सरकारचा मोठा निर्णय…सुरु आहे या घडामोडी

ऑगस्ट 29, 2025
rohit pawar
महत्त्वाच्या बातम्या

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश, कोणत्याही सुविधा नाही…रोहित पवार यांचा गंभीर आरोप

ऑगस्ट 29, 2025
IMG 20250828 WA0508 e1756433976745
इतर

चेन्नई क्रिकेट दौऱ्यासाठी नाशिकचा साहिल पारख महाराष्ट्राचा कर्णधार…समकित सुराणा देखील संघात

ऑगस्ट 29, 2025
amol khatal
महत्त्वाच्या बातम्या

संगमनेरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला…राजकीय वातावरण तापले

ऑगस्ट 29, 2025
Shirdi Sai baba e1727984889927
संमिश्र वार्ता

साईबाबा संस्थानच्या मोफत पार्किंग सुविधेमुळे शिर्डीतील वाहतूक सुरळीत….

ऑगस्ट 29, 2025
Next Post
sania shoaib

या क्रिकेटपटूंच्या पत्नींचा आहे खेळाशी संबंध; बघा, कोण कोण आहेत त्या...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011