मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही भारतीय शेअर बाजार चमकदार राहिला. गेल्या एका वर्षात अनेक समभागांनी शेअर धारकांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटानंतर भारतीय शेअर बाजारासाठी यंदाचे वर्ष म्हणजे 2022 हे खूप यशस्वी मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे.
पेनी स्टॉकमध्ये जोखीम असते, परंतु मजबूत परतावा देण्याच्या बाबतीत त्यांना ब्रेक नाही. तथापि, भक्कम मूलभूत तत्त्वे असलेली छोटी कंपनीही चांगली गुंतवणूक असू शकते. मागील वर्षीच्या कोरोनाच्या संकटानंतर शेअर बाजारासाठी मागील वर्ष बरेसशे सकारात्मक ठरले आणि आता यंदाचे वर्ष आशादायक मानले जाते. कारण यंदा मोठ्या संख्येने लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप कंपन्यांनी मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे या यादीमध्ये काही पेनी स्टॉकचा देखील समावेश असून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे काहीसे धोक्याचे आहे, असे सांगितले जाते. परंतु कंपनीचे तत्त्व आणि व्यवसाय मजबूत असेल तर हे स्टॉक चांगला परतावा देतात. परताव्याच्या बाबतीत आदित्य व्हिजन ही अशीच एक कंपनी आहे. आदित्य व्हिजनने अवघ्या 2 वर्षात गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. आदित्य व्हिजनच्या समभागांनी 2 वर्षांत गुंतवणूकदारांना सुमारे 3200 टक्के परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया की ज्या गुंतवणूकदारांनी 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती, सध्या त्याची किंमत किती आहे.
दि. 26 डिसेंबर 2019 रोजी आदित्य व्हिजनचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 19.20 रुपयांच्या पातळीवर होते. 4 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 635.80 रुपयांवर बंद झाले. कंपनीच्या समभागांनी 2 वर्षात गुंतवणूकदारांना सुमारे 3200 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या त्याचे मूल्य 33 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. म्हणजेच गुंतवणूकदारांना थेट 32 लाख रुपयांचा फायदा झाला असता.
एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 1 लाख रुपये गुंतवले असतील तर ती रक्कम आजच्या तारखेनुसार 16.60 लाख रुपये झाली असती. कारण आदित्य व्हिजनचे शेअर्स 2021 च्या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून आदित्य व्हिजनच्या शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे. जुलै 2021 मध्ये कंपनीचे शेअर्स 1,564.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचले होते. गेल्या एका महिन्यात कंपनीचे शेअर्स सुमारे 18 टक्क्यांनी घसरले आहेत.