इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शेअर बाजारांमध्ये सध्या प्रचंड चढ – उतार सुरू आहे, परंतु त्यातच मल्टीबॅगर पेनी स्टॉक मध्ये चांगला फायदा दिसून येतो. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये शेअरने अवघ्या सहा महिन्यांत प्रचंड परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. सहा महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांना 6,142.27 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. कालही कंपनीचा शेअर वाढतच राहिला आणि 4.94 टक्के वाढून 60.55 रुपयांवर बंद झाला.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये सातत्याने घसरत होते. गेल्या एका महिन्यात तो 46.34 टक्के पर्यंत कमी झाला आहे. मात्र, आज कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून आली. सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकची किंमत BSE वर फक्त 95 पैसे होती, जी आता 60.55 रुपये झाली आहे. या कालावधीत या समभागाने 6,142.27 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, या समभागांनी यावर्षी आतापर्यंत 1,973.63 टक्के परतावा दिला आहे. या काळात हा शेअर 2.92 रुपयांवरून 60.55 रुपयांपर्यंत वाढला.
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर किंमत चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 62.42 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या वर्षी 2022 मध्ये या काउंटरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याला आतापर्यंत 20.73 लाख रुपयांचा नफा झाला असता.
(महत्त्वाची सूचना- शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा योग्य तो सल्ला घ्यावा)