विशेष प्रतिनिधी, मुंबई
खतांच्या वाढलेल्या किंमतींवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारला चांगलेच खरमरीत पत्र लिहीले आहे. कोरोनाचे संकट सुरू असताना त्यात आता खतांमुळे शेतकरी आणखी अडचणीत येत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. ही बाब म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचा टोलाही पवार यांनी पत्रात लगावला आहे.
पवार यांनी केंद्रीय रासायनिक व खते मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहीले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना संसर्गामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे, त्याला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. याप्रश्नी गौडा यांनी तातडीने लक्ष घालावे आणि खतांच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी पवार यांनी पत्रात केली आहे. ११०० रुपयांचे खत सध्या थेट १७०० रुपयांना मिळत आहे. तर, जी खत गोणी १२०० रुपयांना मिळत होती ती आता १९०० रुपयांना मिळते आहे.
पवार यांनी लिहिलेले पत्र असे