मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांना पुन्हा ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रीया केली जाणार आहे. तशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात पोट दुखत असल्याने पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते.
https://twitter.com/nawabmalikncp/status/1381201501901627397