मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईत लालबागचा राजाचे दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज कुटुंबीयांसह घेतले. यावेळी त्यांनी बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर लढण्याचं बळ मिळो, अशी लालबागच्या राजाचरणी प्रार्थना केली. त्यानंतर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा आहे. एकीकडे ज्ञानेश्वर महाराव यांच्या उपस्थितीत हिंदू देवतांचा अपमान ऐकायचा आणि दुसरीकडे दर्शनासाठी यायचं हे ढोंग आहे अशी टीका केली.
प्रवीण दरेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत ही टीका केली त्यात म्हणाले की, मध्यतंरी शरद पवार ४० वर्षाच्या खंडानंतर किल्ले रायगडावर गेले होते. ते मुख्यमंत्री होते तेव्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले होते. त्यानंतर ३० वर्षांनी ते पुन्हा लालबागचा राजाच्या दर्शनाला आले. माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे की, शरद पवार यांना हिंदुत्वाबाबत सुबुद्दी मिळो.
दरेकड पुढे म्हणाले की, ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामचंद्र, विठुराया आणि हिंदुत्वाचा अपमान केला. त्यावर काहीही न बोलता शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले. निवडणुकीसाठी नौटंकी का होईना पण, लालबागच्या राजाने शरद पवार यांना सुबुध्दी दिली. पण, महाराष्ट्राच्या जनतेला ही ढोंगी श्रध्दा दिसून येत आहे असे खोचक वक्तव्य दरेकर यांनी केले. .
शरद पवार यांनी आज जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शरद पवार यांच्यावर ही टीका केली.