मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माझ्यातील आणि अजित पवार यांच्यातील बैठक गुप्त नसल्याचे शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. अजित पवार हा माझा पुतण्या आहे आणि पवार कुटुंबातील वडिलधारा माणूस मी आहे. त्यामुळे मला कुणी भेटायला आले किंवा मी कुणाला भेटायला बोलावले हा चर्चेचा विषय बनू शकत नाही. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय ? असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील एक गट भाजपमध्ये गेला असला तरी मूळ पक्ष भाजपसोबत जाणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्ष सत्तेचा गैरवापर करत आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांना नोटिसा पाठवण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जात आहे. सामान्य जनतेला हे आवडत नाही. त्यामुळे त्याचे परिणाम भविष्यात दिसतील असेही ते म्हणाले
यावेळी इंडिया आघाडीच्या बैठकी बाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. इंडिया आघाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुंबईच्या हयात हॉटेलमध्ये १ सप्टेंबर रोजी विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
यावेळी त्यांनी मणिपूरच्या मुद्दयावरही भाष्य केले. मणिपूरचा प्रश्न हा देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. संसदेतील भाषणात पंतप्रधानांनी त्यावर भाष्य केलं, परंतु जनतेच्या मुद्द्यांकडे, राष्ट्रीय प्रश्नांकडे सहनशीलतेनं पाहिले जात नाही. राज्यांचे प्रश्न गांभीर्याने घेणं गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
Sharad pawar