नवी दिल्ली – शरद पवारांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. संजय राऊत यांच्यासह महाराष्ट्रातील सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. महाराष्ट्रातले सगळे आमदार प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये असल्यामुळे या आमदारांना पवारांनी रात्री स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व भाजपचेही आमदार उपस्थितीत होते. विशेष म्हणजे ईडीने आजच खा. राऊत यांच्यावर कारवाई केलेली असतांना पवारांच्या बाजूला एकीकडे राऊत तर दुस-या बाजूला गडकरी बसलेलले होते. त्यामुळे त्यांचा हा फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे…..