इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी १६६ जिंकून देण्याची गँरंटी देतो म्हणत दोन लोकांनी आपली भेट घेतल्याचे म्हटले आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
पवार म्हणाले की, दिल्लीत दोन लोकं मला दिल्लीमध्ये भेटायला आले. त्यांची नावे व पत्ते माझ्याकडे नाहीत. दोघांनी मला सांगितले की, महाराष्ट्रात २८८ जागांपैकी १६० जागा जिंकून देण्याची गँरंटी देतो. मला आश्चर्य वाटलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला शंका नव्हती. असे लोक भेटत असतात पण, दुर्लक्ष केल.
हे झाल्यावर त्या लोकांनी राहुल गांधी यांच्याशी भेट करुन दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधी यांच्या समोर म्हटलं. त्यानंतर या कामात आपण लक्ष देऊ नये असं माझं आणि राहुल गांधी यांचं मत झाली. हा आपला रस्ता नाही, लोकांनी जो काही निर्णय असेल तो स्विकारु असे ठरल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या दाव्याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही दुजोरा दिला आहे.
एकीकडे राहुल गांधी यांनी मतदार यादीवरुन रान उठवलेले असतांना शरद पवार यांनी हा खळबळजनक दावा केल्यामुळे राजकीय वर्तुळात यावर आता प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहे.