मुंबई – काँग्रेसच्या नेत्यांची सिल्वर ओक येथे पवार यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत वेगळे लढण्याचे वक्तव्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले. तुम्ही जर वेगळे लढणार असेल तर ते आधी सांगा असेही पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या बैठकीत आणखी काय विषय होते. याबाबत फारशी चर्चा बाहेर आली नाही. पण, या बैठकीत एकुण राज्याच्या राजकारणावर सविस्तर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षाच्या विषय़ावरही चर्चा करण्यात आली.
पवारांबरोबर झालेल्या बैठकीत नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे या बैठकीबाबत अनेक तर्क व्यक्त केले जात होते. या बैठकीत पवार यांनी दिल्लीत वेगळे लढण्याचे ठरले का ? तसे ठरले असेल तर अडचण नाही. पण, नाना पटोले यांना अधिकार दिले असेल तर तसेही सांगा असे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितले. पटोले यांनी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर त्यांच्या वक्तव्यावर पवार यांनी बोलणे टाळले होते. ते म्हणाले की, नाना पटोलेंसारख्या लहान माणसांवर बोलणार नाही, सोनिया गांधी बोलल्या असत्या तर मी भाष्य केले असते असे त्यांनी सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन्ही पक्ष एकत्र असले तरी प्रत्येेकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याचेही पवार यांनी यावेळी सांगितले. पण, मित्रपक्षाला दुखावणे बरोबर नाही असेही ते म्हणाले.