इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही भेट संसदभवन परिसरात झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाचे निमंत्रण देण्यासाठी शरद पवारांनी ही भेट घेतल्याचे सांगण्यात आले.
या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलतांनाा सांगितले की, साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. यावेळी शेतक-यांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. त्याव्यतिरिक्त आमच्यात काहीही चर्चा झालेली नाही.
दिल्ली येथे होणा-या साहित्य संमेलनाचे शरद पार स्वागताध्यक्ष आहे. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थितीत रहावे यासाठी हे आमंत्रण असल्याचेही बोलले जात आहे.