इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या असून त्याचे निमित्त शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त झालेल्या भेटी ठरल्या आहे. गुरुवारी शरद पवार यांना सकाळी वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी सहकुटुंब व प्रमुख नेत्यांबरोबर भेट घेतली. त्यानंतर दुपारी उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता व भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होण्याचे बोलले जात आहे.
लोकसभेत राज्यात यश मिळाल्यानंतर विधानसभेत मात्र शरद पवार गटाला जोरदार धक्का बसला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदार व आमदारांमध्ये आपण सत्तेच्या बाजूने राहणे गरजेचे आहे असा मतप्रवाह सुरु झाला. ४ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या खासदारांच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यात दोन गट तयार झाले. एका गटाने आपण स्वतंत्र अस्तित्व ठेऊन सत्तेत सामील व्हायला हवे असे म्हटले आहे. तर दुसरा गट अजित पवार गटाबरोबर सत्तेत जाण्याच्या विचाराचा आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शरद पवार यांच्या गटाचे आमदार, खासदार हे अजित पवार गटात जातील अशी चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर दिल्लीत या मोठ्या हालचाली सुरु झाल्या. या सर्व घडामोडीत महत्त्वाची भूमिका उद्योगपती गौतम अदाणी यांची असल्याचेही बोलले जात आहे.