इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
विधानसभा निकाला नंतर आज शरद पवार कराडच्या दौऱ्यावर गेले. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद त्यांनी मौन सोडलं. लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महविकास आघाडीला मोठा झटका बसला. शरद पवार गटाला अवघ्या १० जागाच मिळाल्या. पण, शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही. पण, आज त्यांनी मौन सोडलं व आपली भूमिका मांडली. यावेळी पवार म्हणाले की पराभवाची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहणं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं. मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. मुद्दा तो नाही अशी प्रतिक्रिय दिली.
यावेळी त्यांनी मविआच्या पराभवाचं कारण काय? यावरही भाष्य केले. जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे, लाडक्या बहिणीचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचार हाही करण्यात आला, दोन अडीच महिन्याची रक्कम आता देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं.
यावेळी त्यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात असेही ते म्हणाले.
यावेळी ते म्हणाले की, अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात थोडसं आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने या कँपेन करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला.