शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सुविधांअभावी ३५ कंपन्याचे हिंजवडीतून स्थलांतर…शरद पवार यांची सरकारवर टीका

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 14, 2024 | 11:02 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sharad Pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरालगत उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. आता मात्र या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. सत्ताधारी भाजप उद्योगांना हव्या त्या सुविधा देऊ शकले नाहीत. परिणामी, ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडी येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. त्याअगोदर पवार यांनी चिंचवडमध्ये रोड शो केला. माजी खासदार नाना नवले, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे संजोग वाघेरे, तुषार कामठे, कैलास कदम, नवनाथ जगताप या वेळी उपस्थित होते. ते म्हणाले, की एके काळी देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांचे राज्य होते; मात्र काही ठराविक लोकांच्या हातामध्ये सत्ता आली. त्यामुळे गेली दहा वर्ष महाराष्ट्राचे चित्र काही चांगले नाही. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील विकास पाहण्यासाठी बाहेरील लोक येत होते. आता तसे चित्र राहिले नाही. आम्ही उद्योग वाढविले, आयटीपार्क आणले. हजारो लोकांना काम दिले; मात्र आता या शहराचा चेहरा दिवसेंदिवस खराब होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पाणी, वीज, वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधाबाबत गेल्या काही वर्षात हवे तसे काम झाले नाही. त्यामुळे ३० ते ३५ कंपन्या हिंजवडीतून बाहेर गेल्या. हजारो लोकांचा रोजगार गेला. हे न शोभणारे चित्र आहे. त्यात दुरूस्ती करणे गरजेचे आहे.

ज्यांच्या हातात दहा वर्ष सत्ता होती, त्या लोकांनी सत्तेचा विनियोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही. त्यामुळे आज ही अवस्था आली आहे. ही अवस्था बदलण्यासाठी परिवर्तन, सत्तेत बदल करणे गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले. सांगवी परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक आणि जगताप कुटुंबाचे विश्वासू अशी ओळख असलेले अंबरनाथ कांबळे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी हितचिंतकांची मदत घ्यावी, जाणून घ्या, शुक्रवार, १५ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

मलिक यांच्याविरोधातील याचिका तथ्यहीनः हायकोर्ट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
court 1

मलिक यांच्याविरोधातील याचिका तथ्यहीनः हायकोर्ट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011