– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी सोहळा
– ॲड.नितीन ठाकरें यांनी केली होती नाव देण्याची मागणी
..
नाशिक:जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आर्किटेक्ट महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे नाव देण्यात यावे हा पाठपुरावा गेली ७-८ वर्षापासून ॲड.नितीन ठाकरे हे सभापती असतांना करत होते. गेल्या डिसेंबर मध्ये संस्थेच्या सर्वसाधारण सभेत देखील ॲड. ठाकरे यांनी शरद पवारांचे नाव संस्थेच्या आर्किटेक्ट महाविद्यालयास द्यावे अशी मागणी त्यांनी पुन्हा केली. उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा होत आहे. मधल्या काळात संस्थेच्या आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या मान्यतेबाबत अडचणी आल्या होत्या. त्यावेळी दिल्लीमध्ये आर्किटेक्ट कौन्सिलची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौ-यावर येत असल्याने त्यांच्या हस्ते सदर नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला असल्यामुळे अॅड. ठाकरे यांचे स्वप्न साकार होणार असल्याची पोस्ट त्यांच्या समर्थकांनी टाकली आहे. या पोस्टबरोबरच त्यांनी डिसेंबर मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वेळी नितीन ठाकरे यांनी केलेल्या नामकरण मागणीचा व्हिडीओही शेअर केला आहे.
वार्षिक सर्वसाधारण सभेतला हा हा व्हिडिओ
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!