इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
धुळेः गेल्या दहा वर्षांपासून मोदी यांच्या हातात सत्ता आहे आणि ते प्रश्न मला विचारतात. मी एवढेच केले, तुमचा सत्तेचा उन्माद कमी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला,” राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
पवार यांची आज धुळे जिल्ह्याती शिंदखेडा इथे जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. “देशाची लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट घेतले. लोकशाही वाचवण्यासाठी थोडी काळजी होती. मोदी यांच्या मनात काय होते हे कळत नव्हते. त्यांनी लोकसभेला ४०० पारचा नारा दिला. लोक हुशार होते. ४०० लोकांना समजले. लोकांना कळले, की देशाची घटना बदलायची आहे, म्हणून त्यांना ४०० पर हवे होते. त्यांनी हा डाव हाणून पाडला,” असे सांगून पवार म्हणाले, की महाराष्ट्रामध्ये मोदी आणि त्यांचे मंत्री दौरे करत आहेत. आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी १० वर्षांचा हिशोब दिला पाहिजे. त्यांची १० वर्षांपासून सत्ता आहे आणि ते आम्हाला विचारतात, की शरद पवार यांनी काय केले?
आज महाराष्ट्रामध्ये ७०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. केंद्रात आमचे सरकार असताना आम्ही शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न केले. आज शेतकरी चिंतेत आहे. आम्ही देशातील शेतकऱ्यांचे कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी कर्जमाफीचा प्रस्ताव आणला. आम्ही ७१ हजार कोटींचे कर्ज माफ केले; मात्र मोदी ते करत नाहीत. एकीकडे महिलांवर अत्याचार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यात ९०० महिलांवर अत्याचार झाले आणि सरकार म्हणते आम्ही लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणण्यापेक्षा तिला सुरक्षा द्या” अशी टीका त्यांनी केली.
राज्यातील शेतकरी आज अडचणीत आहेत. आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्ज माफी देणार आहोत. जो नियमित कर्ज भरेल, त्यांना ५० हजाराचे अनुदान देणार. शेती अवजारांवरील जीएसटी बंद करणार. आज राज्यात गुंडगिरी वाढली आहे. या भागात नवीन उद्योगधंदे यायला तयार नाहीत. शिंदखेडा तालुक्यात मुबलक पाणी आहे; मात्र उद्योगधंदे नाहीत. या तालुक्याचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे माहविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा”, असे आवाहन पवार यांनी केले.









