गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

संविधानात बदलाचा मोदींचा कट उधळला…शरद पवार यांची टीका

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 11:42 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Sharad Pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लातूरः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आबंडेकर यांच्या संविधानात बदल करण्याचा कट रचला होता; पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. महायुतीच्या काळात राज्याची पिछेहाट झाल्याची टीका त्यांनी केली.

शरद पवार यांची शनिवारी उदगीर येथे सभा झाली. पवार यांनी पुन्हा एकदा पं मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, की ५-६ महिन्यांपूर्वी आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे गेलो. त्या वेळी देशाचे राज्य गेल्या १० वर्षांपासून मोदी यांच्या हातात होते. देशातील शेतकरी वर्ग संकटात सापडला होता. त्याची अस्वस्थता घालवायची असेल, तर मोदी यांना हलवून जागे करण्याची गरज होती. त्यासाठी आम्ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली. त्यानंतर आम्ही लोकसभा निवडणुकीला सामोरे गेलो. मोदी यांना लोकसभा निवडणुकीत ४०० हून जास्त जागा हव्या होत्या. त्यांनी यासाठी ‘४०० पार’चा नारा दिला होता.

मोदी यांच्या घोषणेत काहीतरी पाप असल्याचा संशय आम्हाला आला होता. आमचा संशय अगदी खरा होता. या सरकारने डॉ. आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानात काही बदल करण्याचा डाव रचला होता. त्यातून जनतेच्या अधिकारांवर गदा येणार होती. हे कट कारस्थान पूर्ण करण्यासाठी मोदी व त्यांच्या सरकारला ४०० च्या आसपास जागांची गरज होती. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देऊ इच्छितो. येथील जनतेने मोदी व शहांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले. यामुळे संविधानात बदल करण्याचा कट उधळला गेला, असे ते म्हणाले.

आज महाराष्ट्रापुढे अनेक प्रश्न आहेत. हे एक देशातील एक महत्त्वाचे राज्य आहे. हे राज्य शैक्षणिक चळवळीत प्रचंड योगदान देणारे आहे. शेतीतही महाराष्ट्राचे उल्लेखनीय योगदान आहे; पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम आज महाराष्ट्राला भोगावे लागत आहेत. काँग्रेस आघाडीच्या काळात आम्ही महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य बनवले. पण आता हा क्रमांक ६ वर घसरला. अनेक क्षेत्रांत महाराष्ट्र मागे पडले, असे निदर्शनास आणून पवार म्हणाले, की उद्योगधंदे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट होते. आम्ही साखर कारखानदारी काढली. अन्य कारखाने काढले. हाताला काम मिळेल याची व्यवस्था केली. पूर्वी ही कारखानदारी मुंबईपर्यंतच मर्यादित होती. ती मुंबईबाहेर कशी नेता येईल? याची काळजी आम्ही घेतली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोदी व शाह यांनी अवघा महाराष्ट्र लुटला…उद्धव ठाकरे यांचा हल्ला

Next Post

लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणा-या महिलांचा फोटो काढून पाठवा, धनंजय महाडिक (बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 22

लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये पैसे घेऊन काँग्रेस रॅलीत दिसणा-या महिलांचा फोटो काढून पाठवा, धनंजय महाडिक (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अपूर्ण कामे पूर्ण होतील, जाणून घ्या, गुरुवार, १९ जूनचे राशिभविष्य

जून 18, 2025
Untitled 53

मुक्त विद्यापीठ ठरले भारतातील पहिले माजी विद्यार्थ्यांची सर्वाधिक नोंदणी असलेले विद्यापीठ…इतकी आहे विद्यार्थीसंख्या

जून 18, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ लाभार्थींसाठी सरकारने घेतला आणखी एक मोठा निर्णय…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0320 1

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू…

जून 18, 2025
WhatsApp Image 2025 06 18 at 5.12.48 PM e1750253428522

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन…

जून 18, 2025
nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011