पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंदापूर विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिल्यामुळे येथे त्यांच्या गटाचे नेते नाराज आहे. आज शरद पवार यांनी इंदापुरमध्ये या नाराज नेत्यांची भेट घेतली. पण, त्यांचा दौरा आटोपताच नाराज असलेले अप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवार गटाचे विदयमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
आज शरद पवारांनी राजकारणात सक्रिय असलेल्या चार मोठ्या घराण्यांच्या भेटी घेतल्या. पण, सर्वच नेत्यांची नाराजी दूर त्यांना करता आली नाही. जगदाळे हे पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहे. त्यांनी जनतेसमोर खोटं बोलणा-या व्यक्तीला साथ देणार नाही असे सांगत हर्षवर्धन पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांच्या या भूमिकेमुळे इंदापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.