मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी शरद पवार गटाची २२ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांना संधी देण्यात आली. आता शरद पवार गटाचे ६७ उमेदवार जाहीर झाले आहे. या यादीत नाशिक जिल्ह्यात सिन्नर – उदय सांगळे, नाशिक पूर्व – गणेश गिते, येवला – माणिकराव शिंदे ,दिंडोरी- सुनीता चारोस्कर बागलाण- दीपिका चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाची व काँग्रेसची दुसरी यादी समोर आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने ४८ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर दुस-या यादीत २३ जणांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे दोन्ही यादी मिळून आता ७१ उमेदवार जाहीर झाले आहे. ९० जागा काँग्रेसच्या वाटयाला जाणार आहे. त्यामुळे १९ जागा अद्याप बाकी आहे.
शिवसेनेच्या पहिल्या यादीत ६५ नावांचा समावेश होता. पण, त्यानंतर १ नाव सामना मध्ये वगळण्यात आले होते. त्यानंतर दुस-या यादीत १५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत ठाकरे गटाचे ७९ उमेदवार जाहीर झाले आहे. त्यानंतर तीन अजून नाव नंतर जाहीर करण्यात आले. त्यामुळे ही सख्या ८२ झाली आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गट ८२, काँग्रेस ७१ व राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६७ उमेदवारांची यादी आतापर्यंत जाहीर केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे आतापर्यंत २२० उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. अजून ६८ उमेदवारांची घोषणा बाकी आहे. यात १८ जागा या मित्रपक्षाला देण्यात येणार आहे. महाविकास आघाडीने ९०-९०-९० असा फॅार्म्युला निश्चित केला आहे. त्यात काही जागांची अदलाबदलही केली जाणार आहे. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या ६५ जागांपैकी १२ जागामध्ये शरद पवार गट, काँग्रेस व शेकापने दावा केला आहे.
दुस-या यादीत अकोल्यातून अमित भांगरे, एरंडोलमधून सतिश पाटील, गंगापूरमध्ये सतिश चव्हाण, पार्वतीमधून आश्विनी कदम, बीडमधून संदीप क्षीरसागर, माळशिर उत्तम जाणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बघा संपूर्ण यादी
नाशिक पूर्व- गणेश गीते
येवला- माणिकराव शिंदे
सिन्नर- उदय सांगळे
दिंडोरी- सुनीता चारोस्कर
बागलाण- दीपिका चव्हाण
एरंडोल- सतीश अण्णा पाटील
गंगापूर- सतीश चव्हाण
शहापूर- पांडुरंग बरोरा
परांडा- राहुल मोटे
बीड- संदीप क्षीरसागर
आर्वी- मयुरा काळे
अकोले – अमित भांगरे
अहिल्या नगर शहर- अभिषेक कळमकर
माळशिरस- उत्तमराव जानकर
फलटण- दीपक चव्हाण
चंदगड- नंदिनीताई भाबुळकर कुपेकर
इचलकरंजी- मदन कारंडे
उल्हासनगर- ओमी कलानी
जुन्नर- सत्यशील शेरकर
पिंपरी- सुलक्षणा शीलवंत
खडकवासला- सचिन दोडके
पर्वती- अश्विनीताई कदम