देवघरात भगवान शाळीग्राम ठेवण्यासाठी टीप्स
अनेक कुटुंबांमध्ये देवघरात भगवान विष्णू स्वरूप म्हणून शालिग्राम पूजन केले जाते तसेच काही ठिकाणी तुळशी वृंदावनात शाळीग्राम ठेवला जातो याबाबतची माहिती बघू.
शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि नारदपुराण यामध्ये भगवान विष्णूचे स्वरूप असलेल्या भगवान शाळीग्राम त्यांची महती दिलेली आहे. नेपाळमधील गंडकी नदी मध्ये शाळीग्राम आढळतात. शाळीग्राम याच्या आत मधील निसर्गतः कोरीव व ताशिव वाटावी अशी चक्राकार धारांची रचना असावी. शाळीग्राम नैसर्गिकरित्या चकचकीत, बैठा, गोलाकार असावा. अशा प्रकारचा शाळीग्राम पूजेमध्ये ठेवतात.
एक पेक्षा जास्त शाळीग्राम घरात ठेवू नये. आवळ्याच्या आकारा इतका शक्यतो असावा. तुटलेला भग्नावस्थेतील जोडलेला शाळीग्राम पूजेत वापरू नये. श्याम वर्णाचा असावा. एकादशी, सोमवार, गुरुवार, पोर्णिमा या दिवशी पासून पूजन करावे. शाळीग्राम महाविष्णू स्वरूप असल्याने तर सिद्ध करण्याची गरज नसते तसेच त्याचे विसर्जन होत नाही. तज्ञांच्या सल्ल्याने शाळीग्रामची निवड करावी.