इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
RBI चे माजी गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शक्तीकांत दास डिसेंबर महिन्यात गव्हर्नर म्हणून सहा वर्षे सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीच्या काही महिन्यानंतर त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या पी. के. मिश्रा हे पंतप्रधानांचे प्रधान सचिव १ आहेत. आता त्यानंतर शक्तीकांत दास प्रधान सचिव २ च्या भूमिकेत दिसणार आहे. शक्तीकांत दास हे १९८० बँचचे आयएएस अधिकारी आहे.
