मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्यन खान प्रकरणाशी संबंधित अभिनेता शाहरूख खान आणि तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यातील चॅटिंग कोर्टापुढे आले आहे. या चॅटिंगनुसार, शाहरुखने समीर वानखेडेला एकदा भेटून मिठी मारण्याची ईच्छा व्यक्त केल्याची माहिती पुढे आली आहे.
आर्यन खान प्रकरणी अभिनेता शाहरुख खानकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीबीआयकडून माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईविरोधात समीर वानखेडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी आपली बाजू मांडताना शाहरुख आणि त्यांच्यात झालेल्या चॅटिंगचे स्क्रिनशॉट सादर केले आहेत. हायकोर्टात सादर करण्यात आलेले चॅट्स ३ ऑक्टोबर २०२१ चे आहेत.
तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यातील हा संवाद सकाळी १० वाजून ३७ वाजता झाला आहे. या चॅटनुसार, शाहरुख खान याने समीर वानखेडेशी संपर्क करत मी तुमच्याशी एक मिनिटाकरीता वडील म्हणून बोलू शकतो का, अशी विचारणा केली आहे. त्यावर समीर वानखेडे यांनी कॉल करण्यास सांगितले. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दोघांमध्ये संवाद झाला. त्यात शाहरुख याने समीर वानखेडे यांनी अधिकारी म्हणून बजावलेल्या कर्तबगारिचे कौतुक केले आहे.
‘ही घटना आर्यनच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरेल. मी वचन देतो, चांगल्या मार्गाने या देशाला पुढे नेण्यासाठी प्रामाणिक आणि कष्टाळू तरुणांची गरज आहे. तुम्ही आणि मी आमची भूमिका पार पाडली आहे आणि आता पुढच्या पिढीवर अवलंबून आहे की त्यांना भविष्यासाठी तयार करा. तुमच्या दयाळूपणा आणि समर्थनासाठी पुन्हा धन्यवाद,’ असे शाहरुख म्हणाला आहे.
तुमच्या कामाविषयी मला आदर
शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅटिंगमध्ये शाहरुखने वारंवार समीरच्या कामाचे कौतुक करत त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला. एकदा भेटून मिठी मारायची असून आर्यनवर आज तुम्ही दया दाखवा, अशी विनंतीदेखील केली आहे. त्यावर समीरनेसुद्धा काळजी करू नका, लवकरच भेटू. सध्या हे प्रकरण संपू द्या, असे समीर म्हणाला आहे.
Shahrukh Khan Sameer Wankhede Whatsapp Chating Court