इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – शारीरिक संबंध म्हणजेच सेक्स हा शब्द उच्चारला तरी भुवया उंचावल्याशिवाय राहत नाही. आपण कितीही आधुनिकतेचा डंका वाजविला तरी सेक्स ही बाब अजुनही चारचौघात मोकळेपणाने बोलण्याची बाब झालेली नाही. अशात स्वीडन देशाने सेक्सला क्रीडा प्रकार ठरविला असून लवकरच तिथे सेक्स चॅम्पिअनशिप होणार आहे.
सेक्सबाबत आपल्याकडे प्रचंड गैरसमज आहेत. अपप्रचार म्हणा वा अज्ञानामुळे सेक्स ही संकल्पना अजुनही मोकळेपणाने समजून घेतल्या जात नाही. अशात स्वीडनने इतर देशांना आश्चर्याचा धक्का देत थेट सेक्स चॅम्पिअनशिपची घोषणा केली आहे. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप ८ जून २०२३ रोजी सुरू होणार आहे. काही आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत स्पर्धकांना दररोज सहा तास स्पर्धा करावी लागणार आहे.
सहभागी स्पर्धकांना सामने किंवा अॅक्टिव्हिटीजसाठी अंदाजे ४५ मिनिटं ते एक तास वेळ दिला जाईल. सेक्स चॅम्पियनशिपचे स्पर्धक १६ विषयांमध्ये स्पर्धा करतील. ज्यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश असेल. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांनी निवड तीन परिक्षक आणि प्रेक्षकांचे रेटिंग एकत्र करून केली जाईल. यामध्ये परिक्षकांची मते ३० टक्के असतील तर ७० टक्के जनतेचे रेटिंग असणार आहे. या एकत्रित निर्णयाच्या आधारावर विजेते निवडले जातील.
आरोग्याला चालना
सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्याला चालना मिळेल, अशी भावना स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी व्यक्त केली आहे.
Sex Sports Championship European