इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात पोलिस यंत्रणा कितीही सर्तक आणि कडक असली तरी काही अवैध धंदे सुरूच असतात, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात असाच एक अवैध धंदा उघड झाला आहे. पोलीस आणि मानवी तस्करीविरोधी युनिटने मसुरीमध्ये एका आंतरराज्यीय ऑनलाइन वेश्याव्यवसाय टोळीचा पर्दाफाश करत तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन पुरुष हरियाणातील आणि एक पश्चिम बंगालचा आहे, तर एक महिला दिल्लीची आणि दुसरी युपीमधील अलीगढची आहे. पोलिसांनी एक कार, एक एसयूव्ही आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. व्हॉट्सअॅप आणि ऑनलाइन साईट जस्ट डायलच्या माध्यमातून ही टोळी पर्यटकांची शिकार करत असे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या कारमधून महिलांना लपण्यासाठी नेण्यात आले होते. पोलिसांनी सर्वांना तुरुंगात पाठवले आहे. डीआयजी जनमेजय खंडुरी यांना शहरात वेश्याव्यवसायाच्या तक्रारी येत होत्या. या संदर्भात, मानवी तस्करीविरोधी युनिट डेहराडून आणि एसओजीच्या पथकाला रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे काम सोपविण्यात आले होते. स्पा सेवेच्या नावाखाली हरियाणातील काही जण बाहेरील राज्यातून महिलांना वेश्याव्यवसायासाठी आणून व्हॉट्सअॅप आणि ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती दोन्ही पथकांना मिळाली.
शनिवारी रात्री पोलिस अधीक्षक (गुन्हे) बिशाखा अशोक भदाणे यांच्या निर्देशावरून एएचटीयू टीम, पोलिस आणि एनजीओ एम्पॉवरिंग पीपल्सचे मुख्य कार्यकारी ज्ञानेंद्र कुमार यांनी भट्टा गावाजवळील हॉटेलवर छापा टाकून ऑनलाइन स्पा सेवा चालवणाऱ्या तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली. शहर कोतवाली येथे सर्व आरोपींविरुद्ध अनैतिक वेश्याव्यवसाय रोखण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्याचे साहित्य, गोळ्या आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
सिटी कोतवाल गिरीश चंद्र शर्मा यांनी सांगितले की, एक आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच शहरातील स्पा सेंटर्सची पोलिसांकडून वेळोवेळी तपासणी केली जाते, तसंच स्पाचालकांना सूचनाही देण्यात आल्याचे सांगितले. अटक केलेल्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे सांगितले.
टोळीचा म्होरक्या किशन उर्फ सोनू हा लॉकडाऊनपूर्वी मसुरी येथील एका हॉटेलमध्ये काम करायचा. लॉकडाऊननंतर तो हरियाणातील त्याच्या घरी गेला होता आणि गेल्या महिन्यातच मसुरीला परतला होता. स्पॅसर्व्हिसच्या नावाने जस्ट डायलवर नोंदणी करून त्याने मुलींच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू केला.
हरियाणातील जींदमधील बीबीपूर येथील रहिवासी किशन, हरियाणातील जिंद येथील अमरजीत, पश्चिम बंगालमधील मालदा येथील हबीबपूर येथील रहिवासी स्वपन मंडल, पश्चिम दिल्लीतील शकूरपूर सरस्वती विहार येथील रहिवासी कांचन गुप्ता, उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील सिकंदरपूर येथील रहिवासी सुधा देवी यांना अटक करण्यात आली. मसुरीला भेट देणारे अनेक पर्यटक मुलींचे फोटो ऑनलाइन पाठवून सौदा सेट करत असत आणि ही टोळी ग्राहकांकडून ऑनलाइन पेमेंट घेत असे. यानंतर मुलींना कार आणि एसयूव्हीमधून ठरवून दिलेल्या ठिकाणी पाठवण्यात येत असे.