इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
झारखंडच्या रांचीमध्ये गर्ल्स हॅास्टेलमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटमध्ये १० तरुणींसह ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हॅास्टेलमधून पीडित मुलींना विविध ठिकाणी पाठवले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास सुरु केला आहे.
रांचीच्या लालपूरमध्ये ओम गर्ल्स हॅास्टेल असून येथे हे सेक्स रॅकेट सुरु होते. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक पथक तयार केले. त्यानंतर छापा टाकला. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर या गर्ल्स हॅास्टेलचा वापर ब-याच दिवसांपासून सेक्स रॅकेटसाठी करण्यात येत असल्याचे समोर आले.
या तरुणींची डील व्हॅासटअॅपवर ठरल्यानंतर त्या ठरलेल्या ठिकाणी जात असत. या बदल्यात त्यांना मोठी रक्कम दिली जात होती. याअगोदही पोलिसांनी झारखंडमधील एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. महामार्गलगतच्या सहा हॅाटेल्सवर छापा टाकण्यात आला होता. त्यात २६ तरुण- तरुणीं आक्षेपार्ह स्थितीत आढळले. यातील १७ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले होते.