पाटणा – बिहार मधील पाटणा महानगरपात हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. आंतरराज्यीय सेक्स रॅकेट चालविणारे पश्चिम बंगालस उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमधील दलाल याठिकाणी कॉल गर्ल्स बोलवायचे. याचदरम्यान गर्दनीबाग पोलिसांनी रॅकेटमध्ये सामील एका महिलेला पकडले व तिच्या जबाबावरुन हॉटेलमध्ये छापे टाकले. त्यात उत्तर प्रदेश व बंगालच्या सात कॉल गर्ल्स, हॉटेल संचालक आणि नऊ पुरुष यांच्यासह एकूण १७ लोकांना ताब्यात घेतले.
बिहारची राजधानी पाटणा तशीही विविध अवैध धंद्यांसाठी देशभरात चर्चेत असते. त्यात हा प्रकार नवीन नाही. मात्र शहराच्या मधोमध असलेल्या हॉटेलमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्यामुळे लोकांना धक्का बसला. त्यातही हॉटेलमध्ये पोलिसांनी छापे मारल्यावर जास्तच गोंधळ उडाला. खोल्यांमध्ये तपास केला असता अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. ज्या महिलेला पोलिसांनी सुरुवातीला ताब्यात घेतले ती कॉल गर्ल्सला पाटण्यात आणायचे काम करायची. त्यासाठी हॉटेलचा संचालक ३५०० रुपये द्यायचा. ग्राहकांकडून पैसा घेण्यास मनाई करण्यात आली होती. कॉल गर्ल्सला किमान एक आठवडा हॉटेलमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले होते. तसेच हॉटेल मालकाने सर्वांना आपली ओळख लपवून ठेवण्यास सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे हॉटेल लीजवर चालविण्यासाठी घेतले गेले होते.
व्हॉट्सएपवर फोटो यायचा
व्हॉट्सएपवर फोटो बघितल्यानंतर सेक्स रॅकेट माफिया ग्राहकांकडून किंमत निश्चित करायचे. जास्तीत जास्त जुन्या ग्राहकांनाच हॉटेलच्या खोल्यांमध्ये एन्ट्री दिली जायची. सहा हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जायची. हायप्रोफाईल लोकांचेही या ठिकाणी येणे-जाणे असायचे.
कुठेच एन्ट्री नाही
या हॉटेलमध्ये ग्राहकांना पूर्ण सुरक्षेची हमी दिली जायची. हॉटेलमध्ये कुणाच्याच नावाची किंवा पत्त्याची एन्ट्री व्हायची नाही. रजिस्टरमध्ये कॉल गर्ल्सची नावे राहणार नाहीत, याची पूर्ण काळजी घेतली जायची.