इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अमेरिकेतील लास वेगासमध्ये एक ठिकाण सध्या पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे हे ‘ सेक्स आयलंड’ म्हणून ओळखले जाते. दोन वर्ष कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे हे बेट बंद झाले होते, तरी आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहे. हे ठिकाण यापूर्वी देखील अनेक वादांमुळे चर्चेत राहिले आहे.
अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ‘सेक्स आयलंड’ नावाने ओळखले जाणारे रिसॉर्ट उघडले आहे. एका रिपोर्टनुसार, या रिसॉर्टने एक जाहिरातीद्वारे ते पुन्हा सुरू झाल्याचे घोषित केले आहे. तसेच ते कधी आणि कोणासाठी उघडले जात आहे, असेही या जाहिरातीत सांगण्यात आले आहे. यासोबतच त्याची किंमत काय असेल हेही नमूद करण्यात आले आहे.
अहवालात जाहिरातीचा हवाला देऊन म्हटले आहे की, हे ठिकाण उघडताच केवळ 50 पाहुण्यांनाच 50 तिकिटे दिली जातील. प्रत्येक तिकिटाची किंमत $ 4500 म्हणजेच सुमारे 3.5 लाख रुपये असेल. विशेष म्हणजे हे पेमेंट बिटकॉइनमध्ये देखील केले जाऊ शकते. नोंदणीनंतर, रिसॉर्ट स्वतः लोकांना थेट खाजगी ठिकाणी घेऊन जाईल.
खरं तर, हे रिसॉर्ट लैगिंक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच ते अनेकदा विवादित झाले आहे. येथे येणाऱ्या नागरिकांना अमर्यादित सेक्ससोबत दारू आणि गांजा दिला जातो. येथे येणारे नागरिक किंवा पर्ययक तीन रात्री व चार दिवस वेळ घालवू शकतात. त्यांच्यासोबत दोन मुली इथे राहतील.