अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत दीड कोटींचा अपहार प्रकरणातील संशयितास कळवण न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? अपहार झालेला पैसा नेमका गेला कुठे ? अशा अनेक गोष्टी आता उघडकीस येणार आहे. सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा हा प्रकार समोर आल्यावर देवळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अवघ्या काही तासात देवळा पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयित रोजंदारीवरील कर्मचारी आहे. त्यास काल सापळा रचून सोग्रस फाटा (ता चांदवड) येथून अटक करण्यात आली होती. आज त्याला देवळा पोलिसांनी कळवण न्यायालयात हजर केले असता, त्यास सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.