मनमाड – गेल्या पंधरा वर्षापासून मनमाड व परिसरामध्ये रुग्ण उपयोगी वस्तु व कोरोना काळात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सेवा देणाऱ्या आनंद सेवा केंद्राने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त ६० रुग्णउपयोगी साहित्येचा सेवार्पण केले. यात तीस वॉकर व तीस कमोड चेअरचा समावेश आहे. मनमाड श्रावक संघाचे संघपती रिखबचंदजी ललवाणी, अध्यक्ष पोपटलालजी सुराणा, नामकोचे संचालक सुभाष भाऊ नहार, ज्येष्ठ उद्योजक पोपटशेठ बेदमुथा आदींच्या उपस्थितीत हा सेवार्पण सोहळा झाला. प्रमुख पाहुण्यांनी यावेळी आनंद सेवा केंद्राच्या कार्य विषयी गौरव उद्गार काढले व भविष्यात काही गरज लागली तर आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत असे सांगितले. एकाच वेळेस एवढे वॉकर व कमोड चेअर एखाद्या रुग्णोपयोगी संस्थेत दाखल होणे ही मनमाड सारख्या ठिकाणी फार मोठी गोष्ट असल्याचे प्रतिपादन रिखबचंद ललवाणी यांनी सांगितले. यावेळी अॅड. संजय गांधी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक आनंद सेवा केंद्राचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा यांनी केले. याप्रसंगी आनंद सेवा केंद्राचे उपाध्यक्ष योगेश भंडारी, उद्योजक कांतीलाल लूणावत, नंदलाल बेदमुथा, भिकचंद नाबेडा, सुनील बोगावत, मनोज छाबडा, चंद्रकांत बेदमुथा , संजय गांधी, संदीप संकलेचा, अनिष हिरण, विजूशेठ बेदमुथा, चेतन संकलेचा, संदेश बेदमुथा, आनंद रांका, दीपक शर्मा, अनुप पांडे, ऋषभ शहा, नितीन आहेरराव, संतोष धांदल, हार्दिक बेदमुथा, अभिजित लोढा, श्री अग्रवाल, जग्गु लुणावत, चेतन नाबेडा, साकेत बेदमुथा आदी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संयोजन कल्पेश बेदमुथा व योगेश भंडारी यांनी केले.