शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जातीयवादी देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते : नाना पटोले

by Gautam Sancheti
जुलै 30, 2021 | 9:14 pm
in राज्य
0
FB IMG 1627659448078 1

मुंबई – देश पारतंत्र्यात असताना जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती सध्या देशात आहे. त्यामुळे सेवादलाची जबाबदारी अधिक वाढलेली आहे. सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. परंतु काही शक्ती देशाला तोडण्याचे काम करत आहेत. या जातीयवादी, देशविघातक शक्तींना रोखण्याचे काम सेवादलच करु शकते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सुभाषचंद्र बोस, राजीव गांधी हे सुद्धा सेवादलाचे अध्यक्ष होते. सेवादल हा काँग्रेसचा कणा आहे. देशातील सध्याची परिस्थीती पाहता सेवादलावर मोठी जबाबदारी असून देश तोडण्याऱ्या शक्तींना रोखा व केंद्रातील सरकारचे अपयश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सेवादल महाराष्ट्रचे प्रभारी लालजी मिश्रा, अखिल भारतीय सेवादल समन्वयक व मध्य प्रदेशचे प्रभारी कृष्णकांत पांडे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, देवानंद पवार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाची सेवा करण्याचे व्रत घेऊन नारायण हर्डीकर यांनी नागपुरात सेवादलाची स्थापना केली. काँग्रेसचा विचार हा देशहिताचा विचार असून तो शेवटच्या माणसापर्यंत पोहवण्याचे काम सेवादलाने केले आहे.

सेवादलाने देश जोडण्याचे काम केले आहे. इंग्रजांच्या विरोधात सेवादलाने संघर्ष केला. आता देशातील सत्तेविरोधातच संघर्ष करण्याची वेळ आली आहे. पंडित जवाहरलाल नेहरुंनी या देशाच्या विकासाची पायाभरणी केली. मोठ-मोठे प्रकल्प उभे केले, संस्था निर्माण केल्या. नेहरुंनी उभे केलेले सर्व वैभव एक एक करुन विकण्याचे काम सध्या केले जात आहे. इतिहास पुसण्याचे कामही केले जात आहे. या शक्तींना थोपवण्यासाठी सेवादलाने नव्या ताकदीने काम केले पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाचे काम अशा पद्धतीने करा की त्याची दखल देशपातळीवर घेतली पाहिजे. महाराष्ट्रात सेवादलाने कोरोना काळात लोकांना मदत केली, अन्नधान्य, किराणा किट, औषधे पोहचवली, अतिवृष्टी व पुराच्यावेळीही लोकांच्या मदतीला सेवादल धावले. रक्तदान शिबीरे घेतली, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिम राबवण्यासह अनेक कार्यात सेवादल अग्रभागी राहिले आहे अशी माहिती सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता शेतकरी करू शकणार मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी; असा होणार फायदा

Next Post

राज्यात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन; मार्गदर्शक सूचना जारी

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Mantralay

राज्यात असा साजरा होणार स्वातंत्र्यदिन; मार्गदर्शक सूचना जारी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
khadse

खेवलकर दोषी असेल तर फाशी द्या, मग जावई का असेना….एकनाथ खडसेंचा पलटवार

ऑगस्ट 8, 2025
Untitled 10

खालिद का शिवाजी चित्रपट प्रदर्शनाला माहिती व प्रसारण खात्याची एक महिन्यासाठी स्थगिती

ऑगस्ट 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक गणिते चुकण्याची शक्यता, जाणून घ्या, शुक्रवार ८ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011