मुंबई – राज्यात डेल्टा प्लस या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आणखी १० नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात कोल्हापूरमध्ये ६, रत्नागिरीत ३, आणि सिंधुदुर्गमध्ये १ रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील डेल्टा प्लस रुग्णांची संख्या आता ७६ झाली आहे. आतापर्यंत या विषाणूने ५ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाचा हा अवतार अतिशय संसर्गजन्य आहे. झपाट्याने तो संसर्ग पसरवतो. राज्य सरकारने आजपासूनच राज्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. त्यामुळे डेल्टा प्लसचे रुग्ण पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांनी सर्व कोरोना नियमांचे पालन करावे, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
Ten new cases of Delta Plus variant found in Maharashtra – six in Kolhapur, three in Ratnagiri and one in Sindhudurg, taking the total number of cases in the state to 76. Five of these 76 patients, have died: State Health Department
— ANI (@ANI) August 16, 2021