मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर्थिक कामकाजासाठी बँक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.सध्याच्या काळात बँकिंग व्यवहार ऑनलाइन झाले तरी काही कामकाजासाठी ग्राहकांना बँकेत जावेच लागते. परंतु बँकेला सुट्टी असेल तर अडचण निर्माण होते. पुढील महिन्यात बँकांना काही दिवशी सुट्टी आहे. त्यामुळे ग्राहक तथा खातेदारांनी या संदर्भात माहिती असणे आवश्यक आहे. आता ऑगस्ट महिना संपाण्यास आता केवळ एक आठवडा उरला आहे.
सध्या सणासुदीचे दिवस असून लवकरच गणेशोत्सव मला प्रारंभ होणार असून लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे. तर इतर सण ही पुढील महिन्यात हजेरी लावणार आहे. या सण उत्सवाच्या काळात बँकांही सुट्यांमुळे बंद राहणार आहेत. सप्टेंबर महिन्यात बँका 13 दिवस बंद राहतील. बँकांतील व्यवहार आणि कामे सर्वांनाच करावी लागतात. त्यामुळे सुट्ट्यांची माहिती असणे आवश्यक आहे. बँकेची अत्यावश्यक कामे लवकर पूर्ण करता येतील. पुढील महिन्यात 13 दिवस बँका बंद राहणार असल्या तरी देशभरात सर्वच ठिकाणी एकाचवेळी बँका बंद राहणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सुट्ट्या प्रादेशिक आहेत. याचा अर्थ काही राज्यांमध्ये काही दिवस फक्त बँका बंद राहतील पण इतर राज्यांमध्ये सर्व बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील.
केंद्रीय बँक तीन श्रेणीत लक्षात घेत सुट्यांची यादी जाहीर करते. तात्काळ पैसे पाठविणे आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी आहे. या सुट्या शनिवारी आणि रविवारपेश्रा वेगळ्या असतील. दिवाळी आणि दस-यासारख्या सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते. कोणत्याही बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील.
बँकेच्या सुट्ट्यांची यादी पुढील प्रमाणे आहे ….
1 सप्टेंबर : गणेश चतुर्थी (दुसरा दिवस) – पणजीत बँका बंद
4 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
6 सप्टेंबर: कर्मपूजा – रांचीमध्ये बँका बंद
7 सप्टेंबर: पहिला ओणम – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
8 सप्टेंबर: थिरुओनम- कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँका बंद
9 सप्टेंबर: इंद्रजात्रा-गंगटोकमध्ये बँक बंद
10 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), श्री नरवण गुरु जयंती
11 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
18 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
21 सप्टेंबर: श्री नरवणे गुरु समाधी दिन – कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद
24 सप्टेंबर: शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
25 सप्टेंबर: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
26 सप्टेंबर: नवरात्री स्थापना / लॅनिंगथौ सन्माही चौरेन हौबा – इम्फाळ आणि जयपूरमध्ये बँका बंद राहतील.
(रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार)
September 2022 Bank Holiday List
Banking Finance RBI