नाशिक – केरळ कालीकत येथे २५ वी सिनियर नॅशनल अॅथलेटीक चॅम्पियनशिप स्पर्धा दि.१ ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव, कोमल जगदाळे, यमुना लडकत व किसन तडवी यांनी यश मिळविले. या विजेत्या खेळाडूंचा आज नाशिक येथील कार्यालयात राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विजेत्या खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशिक्षक विजेंद्र सिंह तसेच महेंद्रा कंपनीचे अनिल वाघ आदी उपस्थित होते.
केरळ कालीकत येथे २५ वी सिनियर नॅशनल अॅथलेटीक चॅम्पियनशिप स्पर्धा दि.१ ते ६ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडली. या स्पर्धेत धावपटू संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण तर ५ किलोमीटर स्पर्धेत कांस्य पदक, कोमल जगदाळे हिने ३ किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. तसेच यमुना लडकत हिने ८०० मीटर स्पर्धेत कांस्य पदक पटकावले असून २७ वर्षा पूर्वी असलेल्या महाराष्ट्रातील धावपटूचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. तर किसन तडवी याने ५ किलीमिटर स्पर्धेत सहभाग घेऊन १४ मिनिट १७ सेकंदाची वेळ नोंदवीत बेस्ट परफॉर्मन्स केला. त्याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सन्मान करण्यात आला.