कोविड -१९ च्या वाढत्या घटनांमुळे जवळजवळ ८२.४ टक्के वृद्ध आरोग्याच्या चिंतेने ग्रस्त आहेत. तर सुमारे ७०.२ टक्के वृद्धांना निद्रानाश, वाईट स्वप्नांचा त्रास होत आहे, असा दावा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे. गेल्या एका महिन्यात याकरिता पाच हजाराहून अधिक ज्येष्ठांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
एजवेल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अभ्यासात असेही आढळले आहे की, सुमारे ७०.२ टक्के वृद्धांना निद्रानाश, वाईट स्वप्नांचा त्रास होतो. तसेच या वृद्धांमध्ये आरोग्याची चिंता असून भीती, नैराश्य, चिडचिड, तणाव, एकटेपणाची भावना, विषाणूमुळे कोरोना बाधीत होण्याची भीती, भूक न लागणे आणि अनिश्चितता, भविष्याशी संबंधित चिंता ही त्यांना सतावत आहे.
कोविड -१९ मुळे शहरात, गावात आणि आसपासच्या भागात होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे सुमारे ८२.४ टक्के वृद्धांना गेल्या एक महिन्यापासून आरोग्याच्या चिंतेचा सामना करावा लागला आहे. गेल्या महिन्यात असेही आढळले होते की जवळजवळ ६३ टक्के वृद्ध व्यक्तींमध्ये एकाकीपणामुळे किंवा सामाजिक अलिप्ततेमुळे नैराश्याचे लक्षण आढळले आहेत आणि ते खूप ताणतणाव आहेत.