इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी हा भारतीयांचा लाडका उत्सव आहे. त्यामुळेच या सणावेळी अनेकांना उत्साहाचे भरते येते. सर्वसाधारणपणे दहीहंडीचा उत्सव हा तरुणांकडून साजरा केला जातो. उंच ठिकाणी बांधलेली दहीहंडी मानवी थर रचून फोडली जाते. मात्र, सध्या सोशल मिडियात एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यात दिसते आहे की, ही दहीहंडी महिलांची आहे. खास म्हणजे, तीन थराच्या या दहीहंडीत वरच्या थरावर चक्क आजीबाई आहेत. आपल्या वयाचा कुठलाही मुलाहिजा न बाळगता अतिशय आव्हानात्मक ही दहीहंडी मोठ्या धैर्याने आणि शिताफीने आजीबाईंनी फोडली. या आजीबाईंचे सोशल मिडियाच प्रचंड कौतुक होत आहे. ही दहीहंडी नेमकी कुठली आहे हे अद्याप समोर आलेले नाही पण आजीबाईंचे धाडस आणि महिलांचा जल्लोष हे मात्र सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बघा, हा अफलातून व्हिडिओ
The Incredible Dadi! pic.twitter.com/QiwPHeYYUx
— Dipanshu Kabra (@ipskabra) August 20, 2022
Senior Citizen Women Dahihandi Video Viral