इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादा विशिष्ट्य प्रसंग किंवा आवडते नट-नटी सेल्फीमध्ये टिपण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अक्षरशः क्रेझी फॉर सेल्फी म्हटले तरी चालेल. पण ही क्रेझ किती असावी, याची काही मर्यादा आपण पाळण्याची गरज आहे. ही मर्यादा पाळली नाही की २०० किलोमीटरपर्यंत उगाच प्रवास करण्याची वेळही येऊ शकते.
हो! २०० किलोमीटरचा प्रवास आणि तोही सेल्फीमुळे ओढवून घेतलेला. आंध्रप्रदेशात घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. एका माणसाला वंदे भारत एक्स्प्रेस आतून कशी दिसते हे बघायचे होते. आणि आत जाऊन त्याला सेल्फी घ्यायचा होता. तो गाडीत चढला आणि त्यानंतर सेल्फी घेऊ लागला. त्यात तो एवढा मग्न झाला होता की स्वयंचलित दरवाजे कधी बंद झाले आणि गाडी कधी सुरू झाली, याचे त्याला भानही राहिले नाही. ज्यावेळी त्याला भान आले तेव्हा गाडी पुढे निघाली होती. त्याचा गाडी थांबविण्यासाठी गोंधळ सुरू झाला. पण कुणी काहीच करू शकत नव्हते. कुणी म्हणालं पुढच्या स्टेशनपर्यंत वाट बघ, कुणी म्हणालं टीसी मदत करू शकेल. तो टीसी येण्याची वाट बघू लागला.तोपर्यंत त्याचा नुसता गोंधळ चालला होता. कारण एक साधा सेल्फी घेण्याच्या नादात त्याला गावाच्या बाहेर पडावं लागत होतं.
खिशात पैसे नाही
सेल्फी घेण्यासाठी गाडीत चढताना त्याच्या खिशात छदामही नव्हता. त्यामुळे गाडी सुटल्यावर तो अधिकच घाबरून गेला. कारण पुढच्या कुठल्याही स्थानकावर गाडीने नेऊन सोडले तरी परत येण्याचा प्रश्न होताच. या चिंतेने तो अधिकच गोंधळ घालत होता.
टीसी म्हणाला, वेडा आहेस का?
काही वेळाने टीसी तेथे पोहोचला आणि त्याने त्या माणसाची चांगलीच खरडपट्टी काढली. सूपरफास्ट ट्रेन एका विनातिकीट प्रवाशासाठी थांबवणार आहे का? वेडा आहेस का तू? सेल्फी काढण्यासाठी कुणी ट्रेनमध्ये चढतं का? या शब्दांमध्ये टीसीने त्याला सुनावले. याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/VijayGopal_/status/1615267222590746624?s=20&t=jpSlrs09–01YBcH0T0MCw
Selfie Vande Bharat Express Man Stuck Video Viral