इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – लग्नासाठी मला पुरुषाची गरज नाही, असं म्हणणारी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कनिष्का सोनी मध्यंतरी चांगलीच चर्चेत आली होती. स्वतःशीच लग्न करण्याचा तिचा निर्णयही असाच सगळ्यांच्या भुवया उंचावणारा ठरला होता. स्वतःशीच लग्न केल्यानंतरचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यात ‘मांग में सिंदूर है’ आणि गळ्यात मंगळसूत्र देखील. हा फोटो शेअर करत तिने स्वतःशीच लग्न केल्याचं जाहीर केलं होतं. आता पुन्हा एकदा हि अभिनेत्री चर्चेत आली आहे. आणि आता चर्चा आहे ती तिच्या प्रेग्नन्सीची.
कनिष्का सोनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सध्या न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या कनिष्काने तिचे काही फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यानंतर तिच्या गरोदरपणाची अर्थात प्रेग्नन्सीची चर्चा सुरू झाली आहे. आठवड्याभरापूर्वी कनिष्काने दोन रील पोस्ट केल्या. पांढरा टी-शर्ट आणि काळ्या पॅन्टमधला तिचा हा लूक चाहत्यांना आवडला असला तरी त्यावरूनच ही चर्चा सुरू झाली आहे. या फोटोंमध्ये तिचं पोट थोडं पुढे आल्यासारखं दिसत होतं. त्यावरूनच तिच्या गरोदरपणाच्या बातम्या येत आहेत. पण, कनिष्काला जेव्हा हे कळलं तेव्हा तिने तातडीने यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. आणि त्यासोबत पुन्हा एक फोटो पोस्ट केला आहे.
आधीचे रील्स जिथे केले होते, त्याच जागी हे फोटो शूट करण्यात आले आहेत. या नवीन फोटोंमध्येही तेच कपडे आहेत, ज्यावरून चर्चा सुरू झाली आहे. कनिष्का म्हणते, मी सेल्फ मॅरीड असले तरी सेल्फ प्रेग्नन्ट नाही. कृपया गैरसमज नसावा. माझं पोट वाढलेलं दिसत असलं तरी ते अमेरिकेतला चविष्ट पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्याने झालं आहे. यामुळेच माझं वजनही थोडं वाढलं आहे. पण, हे सगळंच मी खूप एन्जॉय करते आहे. आणि वजन वाढल्याचं तर मला अजिबात दुःख नाही.
वाढलेलं पोट पाहून गरोदर असल्याच्या अफवा पसरू नये म्हणून कनिष्काने ही पोस्ट शेअर केली. ‘पवित्र रिश्ता’, ‘देवी आदी पराशक्ती’ यांसारख्या मालिकांमध्ये कनिष्काने भूमिका साकारल्या होत्या. काही काळ छोट्या पडद्यावर लहान मोठ्या भूमिका साकारणाऱ्या कनिष्काने हॉलिवूडमध्ये चांगले प्रोजेक्ट्स मिळावेत म्हणून छोट्या पडद्याला रामराम केल्याचे समजते.
Self Married Actress Kanishka Soni Pregnant