मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –डीआरआर म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयाच्या,मुंबई क्षेत्र विभागाने सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर मोठी कारवाई करत सोने अवैधरित्या वितळविण्याच्या कामात गुंतलेल्या, तसेच सोने उत्खनन आणि शुद्धीकरण सुविधा घेणाऱ्यांची अवैध कृत्ये उघडकीस आणली. या कामात सहभागी लोकांची विशिष्ट गुप्तचरांकडून माहिती समजल्यावर डीआरआय अधिकानीऱ्यां संबंधित तीन ठिकाणी छापे टाकले आणि तस्करी केलेले सोने, चांदी आणि रोख रक्कम मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली. या कारवाईत सोन्याचे बार आणि वितळवलेल्या स्वरूपातील 23.92 किलोग्रॅम सोने जप्त करण्यात आले, या सोन्यावर विदेशी-चिन्हे अंकित होती. यावेळी 37 किलोग्राम चांदी आणि 5,40,000 रूपये रोख रक्कम वसूल करण्यात आले.
या कारवाईत रोख रकमेसह जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे 19.6 कोटी रूपये आहे. हे अवैध काम करणारे कामगार आणि मदतनीस यांचे जबाब नोंदवल्यानंतर या बेकायदेशीर कृत्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तीला जप्त केलेल्या सोन्याच्या स्त्रोताबाबत समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. तसेच हा माल कायदेशीर असल्याचे समर्थन करणारा कोणताही कागदोपत्री पुरावा सादर करता आला नाही.
हे सोने एका संघटित तस्करी करणाऱ्या गटाचा भाग असण्याची शक्यता जास्त असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. या कारवाईची मोहीम सोन्याच्या तस्करीच्या क्रियाकलापांना आळा घालण्यासाठी आखण्यात आली होती. तसेच यावरून मौल्यवान धातूंसंबंधी कठोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय वचनबद्ध असल्याचे अधोरेखित होते.