इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरच्या प्रकरणात एक मोठी बाब समोर आली आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून सीमाचे भारतातील सचिनशी प्रेम जुळले. त्यामुळे ती नेपाळ मार्गे भारतात आली. तिचे येणे हे बेकायदेशीर असल्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. समाजवादी पक्षाचे माजी प्रवक्ते ठाकूर अभिषेक सोम यांनी सीमा हैदर आणि अमित जानी यांच्यासाठी पाकिस्तानला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले आहे.
ठाकूर यांनी म्हटले आहे की, अमित जानी यांनी पाकिस्तानात जावे आणि नायिका सीमाला सोबत घेऊन जावे, असे अभिषेकने सांगितले. अंजू आधीच आहे, तिने तिथेच राहून चित्रपट बनवावेत. अमित जानी यांनी सीमा हैदरला चित्रपटासाठी दिलेल्या ऑफरबद्दल त्यांनी हे सांगितले. त्यांनी अमित जानी यांना भाजप आणि आरएसएसचे एजंट म्हटले आहे. राजस्थान आणि देशातील सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी असे चित्रपट बनवून त्यांना वातावरण बिघडवायचे आहे. अमित जानी यांच्या चित्रपटांना भाजप कार्यालयाकडून निधी मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला.
त्याचवेळी या प्रकरणी अमित जानी म्हणाले की, अभिषेकने याआधीही शूटिंगदरम्यान सेटची तोडफोड करण्याची धमकी दिली होती. त्यांचे विधान हास्यास्पद आहे. संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह चित्रपटांचे चित्रीकरण केले जाते. अशा विधानांचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. पाकिस्तानला जाण्यासाठीचे तिकीट बुक करण्यात आल्याबाबत ते म्हणाले की, सपाचे पाकिस्तानवर जास्त प्रेम आहे, अन्यथा त्यांनी असे बोलले नसते.
seema haider pakistan return ticket book
UP Uttar Pradesh Samajwadi Party SP Leader