नवी दिल्ली – बॉलिवूड सेलिब्रेटींविषयी त्यांच्या चाहत्यांसह इतरांनाही मोठे आकर्षण असते. त्यामुळेच या सेलिब्रेटींच्या जीवनात काय सुरू आहे, ते जाणून घेण्याची इच्छा अनेकांना असते. बॉलिवूड स्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे लाखो चाहते आहेत. धर्मेंद्र यांच्या पत्नी व सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी या खासदार आहेत. तर त्यांची कन्या इशा देओल ही सुद्धा अभिनेत्री आहे. त्यांचे पुत्र बॉबी आणि सनी देओल हे सुद्धा अभिनेते आहेत. तसेच, धर्मेंद्र यांनी धर्मा प्रॉडक्शन हाऊस या नावाने स्वतःची चित्रपट निर्मिती कंपनीही सुरू केली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या शाही फार्म हाऊसचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बघून हे वाटतच नाही की ते फार्म हाऊस आहे. जणू काही ते पंचतारांकित हॉटेलच आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतो. बघा, त्यांच्या फार्म हाऊसचा हा व्हिडिओ
https://twitter.com/aapkadharam/status/1474617115583791104?s=20