इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोरोनाच्या ओमिक्रॉन BA.4 सब-व्हेरियंटने अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. हैदराबादमध्ये पहिला रुग्ण आढळता असताना आता भारतातील दुसऱ्या रुग्णाचीही नोंद झाली आहे. हा रुग्ण तामिळनाडूचा सांगितला जात आहे. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी एका निवेदनात सांगितले की, राज्यात Omicron च्या BA.4 या सब व्हेरिएंटच्या रुग्णाची पुष्टी झाली आहे. भारतात नोंदवलेले BA.4 उप-प्रकारचा हा दुसरा बाधित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती तामिळनाडूमधील चेनियापासून 30 किमी अंतरावर असलेल्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील नवलूर येथील रहिवासी आहे. याआधी शुक्रवारी हैदराबादमध्ये BA.4 सब-व्हेरियंटचा पहिला बाधित समोर आला होता. वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, “BA.4 चा पहिला रुग्ण आढळल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेतून हैदराबादला गेलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सध्या हा बाधित क्वारंटाईनमध्ये आहे. आणि 9 मे रोजी त्याचा नमुना गोळा करण्यात आला होता. ”
भारताच्यावतीने येत्या सोमवारी (23 मे) एक विशेष बुलेटिन जारी करणार आहे. विशेष म्हणजे, BA.4 आवृत्तीचा पहिला रुग्ण हा सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत 10 जानेवारी 2022 रोजी सापडला होता. तेव्हापासून हा प्रकार सर्व दक्षिण आफ्रिकेतील प्रांतांमध्ये आढळून आला आहे. BA.4 किंवा BA.5 ची नवीन लक्षणे किंवा अधिक गंभीर आजाराशी संबंधित आहेत असे कोणतेही संकेत नाहीत. तथापि, या नवीन प्रकारांवरील वैज्ञानिक अभ्यासाच्या आधारे, ते रोगप्रतिकारक शक्ती टाळण्यास सक्षम असतील, असे सांगितले जाते.
https://twitter.com/dna/status/1527909269068447744?s=20&t=Dbs0vbjjnpRxpsyK4erApA