रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सेकंड हॅण्ड टू-व्हीलर खरेदी करताय? या गोष्टींकडे लक्षात ठेवा…

नोव्हेंबर 27, 2021 | 5:06 am
in राज्य
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


मुंबई – भारताच्या रस्त्यांवर सध्या २० कोटींहून अधिक दुचाकी गाड्या आहेत, असे असताना ग्राहकांनी चांगल्या स्थितीतील आणि त्यांच्या पैशांची ब-यापैकी बचत करून देईल अशा यूज्ड टू-व्हीलरचा शोध घ्यायला हवा. अशी टू-व्हीलर शोधण्यासाठी ग्राहक खूप धडपड करत असतात आणि बहुतेक वेळा अशा दुचाकी विकणारे आणि डीलर्स अशा दोन्हींकडूनही फसवणूकच त्यांच्या पदरी पडते. वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ खूप मोठी आहे, पण असे असूनही ग्राहकांना छोट्या-मोठ्या डीलर्सबरोबर हे व्यवहार करताना खूपच निराशाजनक ग्राहक अनुभव येतो. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांनी सेकंड हॅण्ड किंवा यूज्ड टू-व्हीलर्सची बाजारपेठ आणि योग्य वाहनाची निवड कशी करावी याचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे. याबद्दल सविस्तर माहिती देताहेत (CredR) क्रेडआरचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर, श्री. शशीधर नंदिगम.

कंपनी प्रतिष्ठित हवी:
इथे विचारात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या दर्जाची सेकंड हॅण्ड दुचाकी वाजवी किंमतीत विकत घेऊ पाहणा-यांनी नामांकित, विक्रीनंतरच्या सेवा, विमा आणि इतर मूल्यवर्धित सेवा, सारे एकाच ठिकाणी देऊ शकणा-या कंपनी/ब्रॅण्डचीच दुचाकी खरेदी करायला हवी.

बजेट आखा:
यूजर्सनी वापरलेली दुचाकी खरेदी करताना अत्यंत स्वस्त दरात मिळणारी तसेच त्यासोबत अतिरिक्त कर, अवमूल्यन असे कोणतेही इतर घटक त्यात अंतर्भूत नसतील अशी दुचाकी विकत घेण्याचा विचार करावा. तसेच आपले बजेट ठरवताना दर्जा, बाइकचे वय, ब्रॅण्डचे मूल्य आणि आपल्याला हव्या असलेल्या टू-व्हीलरची उपलब्धता अशा इतर घटकांचाही विचार केला पाहिजे.

अभ्यास करा:
यूज्ड टू-व्हीलर्स विकत घेऊ पाहणा-यांनी ऑनलाइन तसेच सेलर्सच्या माध्यमातून या विषयाची माहिती शोधली पाहिजे व या खरेदीसाठी वास्तविक, प्रत्यक्षात उतरवता येतील अशा अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. ही गोष्ट महत्त्वाची आहे कारण कोणतेही टू-व्हीलर्सचे कोणतेही मॉडेल/ब्रॅण्ड त्यांच्या गरजांशी तंतोतंत जुळणारे असू शकत नाही. शिवाय इतर सेलर्सबद्दल ग्राहकांनी दिलेल्या प्रतिक्रिया, रिव्ह्यू स्कोअर्सही तपासून घ्यायला हवेत. चांगले रेटिंग आणि ऑनलाइन मंचावर ग्राहकांच्या चांगल्या प्रतिक्रिया मिळविणा-या यूज्ड टू-व्हीलर ब्रॅण्ड्सकडून खरेदी करणे केव्हाही चांगले.

घोटाळ्यांपासून सावध रहा:
भारतातील वापरलेल्या दुचाकींची बाजारपेठ अजूनही खूपच असंघटित आहे, तेव्हा घोटाळेबाज, फसवणूक करणा-या लोकांपासून सावध रहा. इथे ग्राहकांनी जागरुक असणे आवश्यक आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीकडून किंवा रस्त्यावरच्या छोट्या-मोठ्या डीलर्सऐवजी प्रमाणित, एखाद्या प्रतिष्ठित विक्रेता संस्थेचे नाव असणा-या सेलर्सकडूनची अशा दुचाकी विकत घेण्याची खबरदारी घ्यायला हवी.

होम टेस्ट राइड:
खरेदीचा व्यवहार पक्का करण्याआधी ग्राहकाने गाडीची ट्रायल रन घेण्याचा विचार करायला हवा. यामुळे आपण निवडलेली दुचाकी चालविण्यासाठी किती आरामशीर आहे, तिची रस्त्यावरची कामगिरी कशी आहे, ब्रेक्स आणि इतर घटकांचे यांत्रिक कार्य कसे चालते या सर्व बारकाईने पहावयाच्या गोष्टींची कल्पना येते. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात संघटित क्षेत्रातील टू-व्हीलर कंपन्या बाइक्सची होम डिलिव्हरी तसेच कॉन्टॅक्टलेस डिलिव्हरीही करत आहेत. ग्राहकांना अशा सेवांचा आवर्जून वापर केला पाहिजे.

कागदपत्रांची पडताळणी:
सेकंड हॅण्ड बाइक विकत घेण्यापूर्वी विमा, आरसी बुक, चॅसिस नंबर, मॅन्युफॅक्चरिंगची तारीख आणि प्रदूषण प्रमाणपत्र या सर्व संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून घेणे अनिवार्य आहे. गाडीवर आधी घेतलेले कर्ज असेल तर बँक हायपॉथीकेशन सर्टिफिकेट असायलाच हवे. आरटीओमध्ये पैसे भरून गाडीच्या कागदपत्रांची पडताळणी करून घेतल्यास तुम्ही निवडलेल्या टू-व्हीलरच्या विरुद्ध नियमभंगांचे कोणते गुन्हे वगैरे दाखल झाले आहेत किंवा नाहीत हेही कळू शकेल. सध्याच्या काळात, डुप्लिकेट कागदपत्रे मिळविणे अतिशय सोपे झाले आहे, त्यामुळे अशी कागदपत्रे देऊन सेलर्सकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी अत्यंत बारकाईने पडताळणी करायला हवी.

वॉरंटीचा कालावधी/विक्रीनंतरचे लाभ:
सेकंड हॅण्ड दुचाकीचा पर्याय निवडताना वॉरंटी संपण्याची तारीख आणि एक्स्चेंजची सुविधा किती काळापर्यंत लागू आहे हे तपासून घेणे चांगले. अशा मुद्दयांची स्पष्टपणे पडताळणी करून घेतली असेल तर खरेदी केलेल्या बाइकचा दर्जा असमाधनकारक वाटल्यास तुम्ही ती परत करू शकता किंवा तिच्या बदल्यात नवीन टू-व्हीलर घेऊ शकता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – स्त्री

Next Post

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – घरगुती सांडपाण्याचा प्रश्न असा सुटेल

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
godavari pollution

इंडिया दर्पण विशेष - नमामी गोदा - घरगुती सांडपाण्याचा प्रश्न असा सुटेल

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011